मुंबई - बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची मुलगी सुहाना चित्रपटांपासून दूर असूनही नेहमी चर्चेत असते. आपल्या सोशल मीडियावरुन ती नेहमी स्वतःचे फोटो शेअर करीत असते. तिच्या चाहत्यांची संख्याही मोठी आहे.
सध्या तिचा एक फोटो चाहत्यांमध्ये कमालीचा उत्सुकतेचा विषय झालाय. हा फोटो आहे एका पार्टीतला. सुहाना खान तिच्या मैत्रीणींसह एन्जॉय करीत असताना दिसत आहे. सुहाना सध्या अमेरिकेतील न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत आहे.