महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सलमानने बॉडीगार्डसोबत केली एक्झरसाईज, व्हिडिओ व्हायरल

सलमान खान त्याच्या फिटनेसबद्दल चांगलाच ओळखला जातो. जीममध्ये तो रोज घाम गाळत असतो. त्याचा एक जीममधला अनोखा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सलमान खान

By

Published : Jun 19, 2019, 7:44 PM IST


सलमान खानच्या लूक्स पासून त्याची बॉडी, अॅक्शन, डान्स यांचे बॉलिवूडमध्ये प्रचंड चाहते आहेत. त्याने शर्ट उतरवावा असे अनेकांना वाटत असते. खरेतर यामागे त्याची भरपूर मेहनत आहे. तो यासाठी आपला बराच वेळ जीममध्ये घालवत असतो. सलमानच्या फिटनेसचा असाच एक व्हिडिओ व्हायरल झालाय.

सलमान खान पन्नाशीनंतरही फिट आहे कारण तो फिटनेसवर भरपूर मेहनत करीत असतो. म्हणूनच तो प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी होतो. व्हायरल व्हिडिओत तो वेगळ्या प्रकारे एक्झरसाईज करताना दिसत आहे.

सलमान खानने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो बॉडीगार्डला पायावर उचलून एक्झरसाईज करीत आहे. त्याचा बॉडीगार्ड एक्झरसाईज मशीनवर बसला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सलमान लिहितो, "इतक्या चढ उतारानंतर माझे बॉडीगार्ड्सनी ओळखले असेल की, माझ्यासोबत ते किती सुरक्षित आहेत."

सलमान खान अलिकडेच 'भारत' या चित्रपटात झळकला होता. बॉक्स ऑफिसवर तुफन चाललेल्या या चित्रपटाने आजपर्यंत २०० कोटी गल्ला जमवला आहे. सध्या तो 'दबंग ३' च्या शूटींगमध्ये व्यग्र आहे. हा चित्रपट २० डिसेंबरला रिलीज होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details