महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 13, 2021, 4:48 PM IST

ETV Bharat / sitara

'अंतिम - द फायनल ट्रुथ'मधील नव्या लूकसह सलमानने जाहीर केली रिलीजची तारीख

सलमान खान 'अंतिम - द फायनल ट्रुथ' या चित्रपटात एका शूर पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर आयुष शर्मा या चित्रपटात एक खलनायक म्हणून झळकणार आहे. हा चित्रपट अॅक्शन आणि स्टंटने भरलेला असल्याचे म्हटले जाते. या चित्रपटाचे दिग्दर्शन सलमान खानचा मित्र आणि दिग्गज अभिनेता महेश मांजरेकर यांनी केले आहे.

सलमान खान
सलमान खान

मुंबई - सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सलमानने त्याच्या आगामी 'अंतीम-द फायनल ट्रुथ' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. सलमानने सोशल मीडियावर चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. सलमानने या चित्रपटाशी संबंधित स्वतःचा एक फोटो व व्हिडिओही शेअर केला आहे. फोटोत सलमान अँग्री लुकमध्ये दिसत आहे. चित्रपटात सलमान खान त्याचा मेहुणा आयुष शर्माशी फाईट करताना दिसणार आहे.

'अंतीम-द फायनल ट्रुथ'च्या रिलीजची तारीख

सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो-व्हिडिओ शेअर करून सांगितले की, हा चित्रपट यावर्षी 26 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. सलमानने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आयुष शर्माचा लूक खूप भयानक दिसत आहे. त्याचबरोबर सलमान खान अँग्री पोलिसमन लूकमध्ये दिसत आहे. उल्लेखनीय म्हणजे, 'अंतीम-द फायनल ट्रुथ' हा चित्रपट सुपरहिट मराठी चित्रपट 'मुळशी पॅटर्न' चा हिंदी रिमेक आहे. मूळ चित्रपटात महेश मांजरेकरांचीही छोटी पण महत्त्वाची भूमिका होती.

सलमानची व्यक्तीरेखा

सलमान खान 'अंतीम-द फायनल ट्रुथ' या चित्रपटात एका शूर पोलिसांच्या भूमिकेत असेल. त्याचबरोबर आयुष शर्मा या चित्रपटात एक भयानक खलनायक म्हणून पहिल्यांदाचझळकेल. हा चित्रपट अॅक्शन आणि स्टंटने भरलेला असल्याचे म्हटले जाते. या चित्रपटाचे दिग्दर्शन सलमान खानचा मित्र आणि मजबूत अभिनेता महेश मांजरेकर यांनी केले आहे. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सलमान खानचा आगामी चित्रपट

सलमान खानचा 'अंतीम-द फायनल ट्रुथ' या चित्रपटाव्यतिरिक्त 'टायगर -3' हा चित्रपटही चर्चेत आहे. 'टायगर 3' च्या माध्यमातून सलमान खान आणि कॅटरिना कैफ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसतील. इमरान हाश्मी या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत असेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे. मनीषने याआधी शाहरुख खानचा 'फॅन' चित्रपट बनवला होता.

हेही वाचा - अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

ABOUT THE AUTHOR

...view details