महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 19, 2021, 3:27 PM IST

ETV Bharat / sitara

RIP Milkha Singh: मिल्खा सिंगच्या निधनाने फरहान अख्तर भावूक, बॉलिवूड सेलेब्रिटीजनी वाहीली श्रध्दांजली

भारताचे दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या फरहान अख्तरने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

RIP Milkha Singh
मिल्खा सिंगना श्रध्दांजली

मुंबई - भारताचे महान धावपटू आणि 'फ्लाइंग शीख' म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिल्खा सिंग यांचे शुक्रवारी १८ जून रोजी निधन झाले. मिल्खा सिंग हे ९१ वर्षांचे होते आणि त्यांच्या नावावर अनेक विक्रमाच्या नोंदी आहेत. बॉलिवूड स्टार्सनीही मिल्खा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. मिल्खा यांच्या मृत्यूनंतर 'भाग मिल्खा भाग' या मिल्खा सिंग यांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारणार्‍या फरहान अख्तरने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टसोबत फरहानने मिल्खा सिंगसोबतचा स्वतःचा एक जुना फोटो शेअर केला आहे.

फरहानने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ''प्रिय मिल्खा जी, मी मनाने आत्ताही स्वीकारायला तयार नाही ती तुम्ही नाही आहात. कदाचित माझा हा जिद्दी स्वभाव तुमच्या शिकवणीमुळे तयार झाला आहे. त्याच जिद्दीमुळे मी एखादी गोष्ट करायची ठरवतो तेव्हा कधीच हार मानत नाही. सत्य हे आहे की तुम्ही कायम जीवंत रहाल कारण तुम्ही मोठ्या मनाचे, लोकांवरप्रेम करणारे, जमीनीवर राहणारे व्यक्ती होतात.''

फरहानने पुढे लिहिले की, ''तुम्ही एक विचार, एक स्वप्न पुढे ठेवले. कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि समर्पणाने एखादी व्यक्ती आकाशातील उंचीला कशी स्पर्श करू शकते हे आपण सांगितले. आपण आमच्या सर्वांच्या जीवनास स्पर्श केला आहे. तुम्हाला एक पिता आणि मित्र या नात्याने ओळखणाऱ्या सर्वांसाठी हे आशीर्वादासारखेच होते आणि जे लोक ओळखत नव्हतात त्यांच्यासाठी नेहमीच प्रेरणा स्त्रोत आणि यशामध्ये नम्रतेचे प्रतीक होतात. तुम्ही मला मनापासून आवडता.''

फरहान अख्तर शिवाय अमिताभ बच्चन, प्रियंका चोप्रा, अक्षय कुमार, तापसी पन्नू, शाहरुख खान, अनुपम खेर, रवीना टंडन, मधुर भंडारकर, अंगद बेदी, जावेद जाफरी, नेहा धूपिया, राहुल बोस यासारख्या बॉलिवूड सेलेब्रीटीजनी मिल्खा सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करीत सोशल मीडियावरुन श्रध्दांजली वाहिली आहे.

हेही वाचा - ‘फ्लाईंग शिख’ मिल्खा सिंग यांच्या निधनावर मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली...

ABOUT THE AUTHOR

...view details