महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

रिअल लाइफ हिरो अमिताभने कोविड सेंटरला दान केले २ कोटी रुपये

सिने आयकॉन अमिताभ बच्चनने दिल्लीतील कोविड -१९ केअर सेंटरला मदतीसाठी हात पुढे केला आहे. बच्चन यांनी श्री गुरू तेग बहादुर कोविड केअर सेंटरला दोन कोटी रुपयांचे योगदान दिले असून या कंपनीने सोमवारी दुपारपासून ३०० खाटांवर काम सुरू केले आहे.

Amitabh Bachchan donates Rs 2 cr to COVID-19 care facility in Delhi
अमिताभने कोविड सेंटरला दान केले २ कोटी रुपये

By

Published : May 10, 2021, 3:33 PM IST

नवी दिल्ली- मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी येथील गुरुद्वारा रकाब गंज साहिब येथील श्री गुरु तेग बहादुर कोविड केअर सेंटरला कोरोनायरस संकटाचा सामना करण्यासाठी 2 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.

दिल्ली शीख गुरुद्वारा मॅनेजमेंट कमेटीचे अध्यक्ष मनजिंदरसिंग सिरसा यांनी ट्विटरवर ही बातमी शेअर केली. यात बच्चन यांनी श्री गुरु तेग बहादुर कोविड केअर सेंटरला २ कोटी रुप.ये दिल्याचे म्हटले आहे. शीख त्यांच्या सेवेबद्दल सलाम करीत आहे, असेही सिरसा यांनी म्हटले आहे.

सिरसा म्हणले की, ऑक्सिजन पुरवठ्याबाबत अडचणी निर्माण झाल्यानंतर बच्चन नियमितपणे सुविधांबाबतची चौकशी करीत असतात. सोमवारी ३०० बेडचे काम सुरू झाले आहे. अमिताभ बच्चन यांनी परदेशातून ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था केली आहे. ते फक्त रील हिरो नाही तर रिअल लाइफ हिरो आहेत, असेही सिरसा म्हणाले.

रविवारी प्रसारित झालेल्या “व्हॅक्स लाइव्हः द कॉन्सर्ट टू रियुनिट द वर्ल्ड” या कार्यक्रमाच्या वेळी बच्चन यांनी जागतिक समुदायाला भारताला मदत करण्याचे आवाहनही केले होते. कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत भारतीय झुंज देत असून इथे सुरू असलेल्या प्रयत्नांना बळ देण्याचे आवाहन त्यांनी केले.

"माझा भारत देश कोविड -१९च्या दुसर्‍या लाटेत झुंज देत आहे. एक नागरिक म्हणून मी सर्व जगातील नागरिकांना आवाहन करतो की उठा, आपल्या सरकारशी, आपल्या औषध कंपन्यांशी बोला आणि त्यांना देणग्या देण्यास सांगा, जनतेच्या मदतीसाठी हात पुढे करण्याची आता गरज आहे. प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे.'', असे बच्चन म्हणाले.

दरम्यान, अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपती शोच्या सीझन १३ मधून पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.

हेही वाचा - मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का; कोरोनाग्रस्त अभिनेत्याने 'मी पुन्हा येईन' म्हणत सोडला प्राण

ABOUT THE AUTHOR

...view details