महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

रश्मिकाने बिग बींसोबत साजरा केला वाढदिवस, दाखवली 'समाधानकारक दिवसा'ची झलक

बॉलिवूडमध्ये दोन बॅक-टू-बॅक प्रोजेक्ट्स साईन करणारी दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आगामी ‘गुडबाय’ या चित्रपटात मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासमवेत दिसणार आहे. रश्मिकाने तिचा वाढदिवस बिग बीसमवेत साजरा केला आणि तिच्या 'समाधानकारक दिवसा'ची एक झलक सोशल मीडियावर शेअर केली.

By

Published : Apr 6, 2021, 2:21 PM IST

Rashmika Mandanna celebrates b'day with Big B
रश्मिकाने बिग बींसोबत साजरा केला वाढदिवस

मुंबई - बॉलिवूडमध्ये नव्याने दाखल झालेली अभिनेत्री रश्मिका मंदान्ना ‘गुडबाय’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासह स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे. करियरच्या इतक्या कमी काळात आपल्याला बिग बीसोबत काम करायला संधी मिळेल असे वाटले नव्हते, असे तिने काही दिवसापूर्वी म्हटले होते. काल तिने आपला वाढदिवस बिग बींसोबत साजरा केला.

रश्मिका ५ एप्रिल रोजी २५ वर्षांची झाली. 'गुडबाय'च्या टीमने तिचा वाढदिवस सिनेमाच्या सेटवर साजरा केला. तिने आपल्या सोशल मीडियावर यातील काही फोटो शेअर केले आहेत.

रश्मिकाने बिग बींसोबत साजरा केला वाढदिवस

फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय की, ''किती समाधानकारक दिवस होता. फोटोसाठी मास्क काही वेळासाठी काढला होता. तुम्ही मात्र नियमित मास्क वापरा.''

'गुडबाय' हा आगामी 'मिशन मजनू' नंतरचा रश्मिकाचा दुसरा बॉलिवूड चित्रपट आहे. बिग बी बरोबर चित्रपटाविषयी बोलताना रश्मिकाने यापूर्वी एक रंजक किस्सा शेअर केला होता.

रश्मिकाने बिग बींसोबत साजरा केला वाढदिवस

"सुरुवातीला जेव्हा मी स्क्रिप्ट वाचत होते, तेव्हा ते फक्त स्क्रिप्टबद्दल होते कारण कोणीही मला माझ्यासोबत कोम काम करणार आहे हे सांगितले नव्हते. नंतर मला सांगण्यात आले की बच्चन सर चित्रपटात काम करणार आहेत. त्यावेळी माझी प्रतिक्रिया थांबा, पुन्हा एकदा सांगा काय? अशी होती. हे खरे व्हावे असे वाटत होते. माझी कोणीतरी गंमत करीत आहे असे वाटत होते.'', असे रश्मिका म्हणाली.

रश्मिका पुढे म्हणाली, "घोषणा होईपर्यंत मला वाटायचे, घडतंय? काय होतंय कुणी मला सांगा प्लिज.'' नंतर घोषणा झाली आणि मी म्हटले, 'असे होते तर.''

रश्मिकाने 'गीता गोविंदम' आणि 'डियर कॉम्रेड' या तेलुगू चित्रपटात काम केले आहे. 'मिशन मजनू'मध्ये तिला सिद्धार्थ मल्होत्रासोबत कास्ट करण्यात आले आहे.

चित्रपट निर्माता विकास बहल दिग्दर्शित 'गुडबाय' हा चित्रपट बालाजी टेलिफिल्म्स आणि रिलायन्स एंटरटेनमेंट निर्मितीचा आहे

हेही वाचा - दीपिका पदुकोणने अमिताभसोबत 'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकची केली घोषणा

ABOUT THE AUTHOR

...view details