मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी पॉर्नोग्राफी प्रकरणी अटक केली आहे. या अटकेला आव्हान देणारी याचिका राज कुंद्राने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. दरम्यान, अशी माहिती समोर येत आहे, की मुंबई पोलीस पुन्हा एकदा राजच्या कंपनीत भागीदार असलेल्या पत्नी शिल्पाची पुन्हा चौकशी करू शकतात. आज पुन्हा शिल्पाला बोलावण्याची शक्यता आहे. यापूर्वी 23 जुलै रोजी शिल्पाची चौकशी करण्यात आली होती. यावेळी तिच्यासमोर पती राज कुंद्राही होता.
पोर्नोग्राफी तयार करून ते काही अॅपच्या माध्यमातून प्रसारित करण्याच्या प्रकरणात राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी रात्री अटक केली होती. मंगळवारी कुंद्राला न्यायालयात दाखल केल्यानंतर त्याला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. यानंतर याची मुदत 27 जुलैपर्यंत वाढवण्यात आली.
शिल्पा पैशांच्या मागणीची अनेक सहस्ये लपवत असल्यााचा गुन्हे शाखेला संशय आहे. शिवाय, राज कुंद्राचा काळा पैसाही लपवण्यासाठी शिल्पाने तिच्या स्टारडमचा वापर केल्याचाही संशय आहे. शिल्पाच्या मनी ट्रेलची काही महत्त्वाची कागदपत्रे गुन्हे शाखेच्या ताब्यात आहेत. त्यामुळे या प्रकरणात शिल्पाची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. यापूर्वी गुन्हे शाखेने शनिवारी कुंद्राच्या घरामधून काही साहित्य जप्त केले होते. या दरम्यान राजची पत्नी शिल्पा शेट्टीचाही जवाब नोंदवला. यावेळेस गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसोबत मुंबई पोलीसचे अधिकारीही उपस्थित होते. बियान कंपनीद्वारे केलेल्या आर्थिक व्यवहाराबात तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले. यावेळीच्या छाप्यात गुन्हे शाखेने क्लोनिंगसाठी शिल्पा शेट्टीचा लॅपटॉप, आयपॅड आणि फोन जप्त केला होता. त्याला अहमदाबाद फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहे. एक-दोन दिवसात त्याचा अहवाल येण्याची शक्यता आहे.
शिल्पाच्या PNB खात्यावर क्राईम ब्रँचला संशय