महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

फरहान अख्तरने कामा हॉस्पिटलला पाठवली पीपीई किट्सची मदत

फरहान अख्तरने पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट (पीपीई) किट्सचे कन्साईनमेंट कामा हॉस्पिटलला पाठवले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी १००० किट्स पाठवण्यासाठी तो प्रयत्नशील होता. यासाठी त्यानने मदतीचे आवाहन केले होते. त्याने सोशल मीडियावरुन मदत केलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत.

Farhan Akhtar
फरहान अख्तर

By

Published : May 20, 2020, 1:39 PM IST

मुंबई - अभिनेता फरहान अख्तरने मुंबईच्या कामा हॉस्पिटलसाठी पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट (पीपीई) किट्स पाठवले आहेत. मंगळवारी त्याने ट्विटरवरुन ही माहिती दिली.

फरहानने एक फोटो शेअर करून ज्यांनी-ज्यांनी पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट (पीपीई) किट्ससाठी मदत केली त्या सर्वांचे आभार मानले आहेत. "हे सांगताना आनंद होतोय की, पीपीई किट्सचे कंन्साईनमेंट कामा हॉस्पिटलला जात आहे. ज्यांनी यासाठी योगदान दिले त्या सर्वांचे आभार," असे त्यांनी म्हटले आहे.

फरहानने पुन्हा एकदा आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किट्सची व्यवस्था करण्यासाठी देणगी देण्याचे आवाहनही केले. फरहानने १००० किट्स देणार असल्याचे यापूर्वी जाहीर केले होते. यासाठी लोकांना मदत करण्याचे आवाहन त्याने केले होते.

हेही वाचा - बोनी कपूर यांच्या घरच्या नोकराला कोरोनाची बाधा, उपचार सुरू

कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी बॉलिवूड तारे तारका आपआपल्या स्तरावर मदत करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details