महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

पंकज त्रिपाठी आणि अक्षय कुमार 'बच्चन पांडे'मध्ये येणार पहिल्यांदाच एकत्र

अभिनेता पंकज त्रिपाठी आणि अक्षय कुमार 'बच्चन पांडे' मध्ये पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन स्पेस शेअर करणार आहेत. पंकज त्रिपाठी 'सुपर 30' आणि '83' नंतर 'बच्चन पांडे' मध्ये तिसऱ्यांदा साजिद नाडियाडवाला सोबत काम करणार आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

By

Published : Dec 14, 2020, 7:20 PM IST

Pankaj Tripathi and Akshay Kumar
पंकज त्रिपाठी आणि अक्षय कुमार

मुंबई- अष्टपैलू अभिनेता पंकज त्रिपाठी 'सुपर 30' आणि '83' नंतर 'बच्चन पांडे' मध्ये तिसऱ्यांदा साजिद नाडियाडवाला सोबत काम करणार आहे. अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी स्क्रिन स्पेस एकत्र शेअर करण्याची ही पहिलीच वेळ असेल.

या गोष्टीबाबत जवळच्या सूत्रांनी सांगितले की, "कृती सेनॉन आणि पंकज त्रिपाठी यांनी यापूर्वी 'लुक्का चुप्पी'मध्ये काम केले आहे. पंकज आणि अक्षय पहिल्यांदा एकत्र काम करणार आहेत. दोघांनाही त्यांच्या कॉमिक टायमिंग आणि चांगल्या अभिनयासाठी ओळखले जाते. त्यामुळे या दोघांची ऑन स्क्रिन केमेस्ट्री कशी असणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. पंकज त्रिपाठी जानेवारीपासून जैसलमेरमध्ये अक्षय, कृती, जॅकलिन आणि अर्शद यांच्यासोबत शूटिंग करणार आहे. "

अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी रंगत वाढवणार

सूत्रांनी पुढे म्हटलं आहे, "या चित्रपटात दोघांना एकत्रित करण्याच्या कल्पनेत साजिद सर आणि फरहाद सर होते. यामुळे या कथेत थोडी विनोदाची रंगत वाढणार आहे. यात बऱ्याच कलाकारांचा समावेश आहे. हे शूट ९० दिवस चालणार असून यात अनेक रंजक वळणे असतील. "

हेही वाचा - राज कपूर यांची ९६ वी जयंती: कपूर मंडळींनी वाहिली स्मरणांजली

यात अक्षय कुमार एक गँगस्टर आणि कृती एक पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. या दोघांची एकमेकांशी ओळख होते तेव्हा कथेला वळण मिळते. 'बच्चन पांडे' २०२१ ला रिलीज होणार आहे.

हेही वाचा - स्पोर्ट्स ब्रँडसाठी शूट करताना करिनाने शेअर केला बेबी बंपचा फोटो

ABOUT THE AUTHOR

...view details