मुंबई - भारताच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईवर आधारित पानिपत या सिनेमाची काही नवी पोस्टर्स प्रसिध्द झालीयत. यात अर्जुन कपूर, संयय दत्त आणि क्रिती सेनान यांच्या पोस्टर्सचा समावेश आहे. येत्या 6 डिसेंबरला हा सिनेमा रिलीज करण्याचा निर्णय सिनेमाची निर्मिती करणाऱ्या रिलायन्स एंटरटेनमेंटने घेतला आहे. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित या सिनेमात अर्जुन कपूर, कृती सेनॉन, संजय दत्त, झीनत अमान, पद्मिनी कोल्हापूरे, मोहनिश बेहेल, यांच्या मुख्य भूमिका आहेत. सिनेमाचं चित्रीकरण जवळपास पूर्ण झालेलं आहे.
'पानीपत'च्या ट्रेलरची उत्सुकता शिगेला...
आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित पानिपत या सिनेमाची काही नवी पोस्टर्स प्रसिध्द झालीयत. यात अर्जुन कपूर, संजय दत्त आणि क्रिती सेनान यांच्या पोस्टर्सचा समावेश आहे. येत्या 6 डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होणार असून याचा ट्रेलर उद्या प्रेक्षकांच्या भेटीस येईल.
मराठा साम्राज्याचा अस्त ज्या युद्धानंतर सुरू झाला त्या युद्धावर हा सिनेमा आधारित आहे. सदाशिवरावभाऊ पेशवे आणि अफगाण बादशहा मोहम्मद शहा अब्दाली यांच्यात झालेल्या युद्धात मराठा साम्राज्याच मोठं नुकसान झालं होतं. जवळपास 1 लाख मराठे या युद्धात मारले गेले. मात्र, त्यासोबतच देशाच्या राजकारणाला एक नवीन कलाटणी मिळाली. यावर या सिनेमाद्वारे भाष्य करण्यात येणार आहे.
रिलायन्स एंटरटेनमेंट, रोहित शेलटकर आणि सुनीता गोवारीकर यांनी मिळून या सिनेमाची निर्मिती केली आहे. सुरुवातीपासूनच या सिनेमाची प्रचंड चर्चा आहे. ऍक्शन आणि व्हिज्युअल इफेक्ट्स यांचीही जोड या सिनेमाला मिळणार आहे, हे काही वेगळं सांगायला नकोच. येत्या 6 डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होणार असून याचा ट्रेलर उद्या प्रेक्षकांच्या भेटीस येईल.