महाराष्ट्र

maharashtra

'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्त अमृता फडणवीसांचं ‘ये नयन डरे डरे’ प्रदर्शित

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे एक नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्त अमृता फडणवीसांनी हे गाणे शेअर केले आहे.

By

Published : Feb 15, 2021, 10:58 AM IST

Published : Feb 15, 2021, 10:58 AM IST

Amruta Fadnavis
अमृता फडणवीस

मुंबई - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी गायिका म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आतापर्यंत अनेक गाण्यांना त्यांनी आपला आवाज देत, गाण्याची आवड जोपासली आहे. 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्त त्यांचे आणखी एक नवीन गाणे प्रेक्षकांसाठी आले आहे. ट्विटरवरून अमृता फडणवीसांनी हे गाणे शेअर केले आहे.

'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्त अमृता फडणवीसांनी शेअर केलेले गाणे

‘ये नयन डरे डरे’ असे या नवीन गाण्याचे बोल आहेत. दिग्दर्शक आशिष पांडा यांनी या गाण्याचे दिग्दर्शन केले असून हे अमृता फडणवीस यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. काही तासातच या गाण्याला लाखो लोकांनी पाहिले आहे.

मात्र, या गाण्यानंतर नेटिझन्सने पुन्हा एकदा अमृता फडणवीस यांना लक्ष केले आहे. अनेकांनी या गाण्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. एका व्यक्तीने 'काय होतीस तू, काय झालीस तू', अशी कमेंट केली आहे तर, एका व्यक्तीने 'ओह नो, नॉट अगेन', अशी कमेंट केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details