महाराष्ट्र

maharashtra

कंगना-राजकुमारच्या 'मेंटल हैं क्या' चित्रपटाला मिळाली नवी रिलीज डेट

यात राजकुमार राव कंगनाच्या अपोझिट झळकणार आहे. चित्रपटाचं नवं पोस्टर शेअर करत चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

By

Published : Apr 17, 2019, 1:15 PM IST

Published : Apr 17, 2019, 1:15 PM IST

'मेंटल हैं क्या' चित्रपटाला मिळाली नवी रिलीज डेट

मुंबई- बॉलिवूडची क्वीन कंगना रनौत नेहमीच वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. मणिकर्णिकापाठोपाठ आता ती आणखी एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे. 'मेंटल हैं क्या', असं या चित्रपटाचं शीर्षक आहे.

हा चित्रपट २९ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र, आता ही तारीख पुढे ढकलली असून आता २१ जूनला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यात राजकुमार राव कंगनाच्या अपोझिट झळकणार आहे. चित्रपटाचं नवं पोस्टर शेअर करत चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

प्रकाश कोवेलामूडी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत तर शोभा कपूर, एकता कपूर आणि शैलेश सिंग यांची निर्मिती असणार आहे. हा चित्रपट सायकोलॉजिक थ्रिलर असणार आहे. कंगना आणि राजकुमारचा नवा अवतार प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details