महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'बाटला हाऊस' एनकाऊंटरची सत्य कथा, नवं पोस्टर प्रदर्शित

या १५ ऑगस्टला सत्य जाणून घ्या, असं कॅप्शन देत जॉनचा या चित्रपटातील फोटो शेअर करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला होता.

'बाटला हाऊस' एनकाऊंटरची सत्य कथा

By

Published : Jul 23, 2019, 5:36 PM IST

मुंबई- अभिनेता जॉन अब्राहम लवकरच 'बाटला हाऊस' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट दिल्लीतील २००८ च्या ‘बाटला हाऊस’ चकमक प्रकरणावर आधारलेला असणार आहे. स्वातंत्र्यदिनी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून चित्रपटाचं नवं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे.

या १५ ऑगस्टला सत्य जाणून घ्या, असं कॅप्शन देत जॉनचा या चित्रपटातील फोटो शेअर करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला होता. बाटला हाऊस प्रकरणामागे असणारी सत्य कथा उलगडण्याचा प्रयत्न या ट्रेलरमध्ये केला गेला होता. निखील अडवाणी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

काय आहे बाटला हाऊस प्रकरण -


२००८ मध्ये दिल्ली पोलीस आणि इंडियन मुजाहिद्दीनच्या चार दहशतवाद्यांच्यात चकमक झाली होती. यात आतिफ अमिन आणि महम्मद साजिद हे दहशतवादी ठार झाले, तर विशेष दलाचे निरीक्षक मोहन चंद शर्मा यांना वीरमरण आले. मात्र, चकमकीत मारले गेलेले लोक हे दहशतवादी नसून ते विद्यार्थी होते, असा दावा नंतर अनेकांनी केला होता. ज्यामुळे या एनकाऊंटविरोधात अनेक आंदोलनं करण्यात आली होती. या सर्वादरम्यान विवादात अडकलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याची कथा आणि त्या रात्रीची खरी बाजू या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details