महाराष्ट्र

maharashtra

श्रीलंकेच्या सामन्याआधी 'मिस्टर आणि मिसेस' कोहलीचे आनंदी क्षण

अनुष्का आणि विराट कोहली यांचा फोटो सध्या व्हायरल झाला आहे. विराटसोबत अनुष्का इंग्लंडमध्ये खास क्षण अनुभवत आहे.

By

Published : Jul 4, 2019, 11:23 PM IST

Published : Jul 4, 2019, 11:23 PM IST

'मिस्टर आणि मिसेस' कोहली


क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघ उत्तम कामगिरी करतोय. भारताने ८ व्या सामन्यात बांग्लादेशचा पराभव केला होता. आता भारताचा मुकाबला श्रीलंकेच्या संघाशी ६ जुलैला होणार आहे. सामन्याच्या अगोदर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत खास क्षण अनुभवतोय. विराटला पाठींबा देण्यासाठी अनुष्का इंग्लंडला पोहोचली आहे. अलिकडेच इन्स्टाग्रामवर विराटने एक फोटो शेअर केलाय. विराट, अनुष्काचा हा फोटो सध्या चाहत्यांचे आकर्षण ठरतोय.

या फोटोत अनुष्का आणि विराट टेबलच्या दोन कोपऱ्यावर उभे असलेले दिसतात. ज्यावर 'मिसेस' आणि 'मिस्टर' लिहिलेल्या फ्रेम दिसत आहेत. हा फोटो शेअर करीत विराटने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''मिस्टर आणि मिसेस.'' या फोटोवर फॅन्स खूप प्रतिक्रिया देत आहेत.

विराटचा हा फोटो इन्स्टाग्रामवर अनुष्कानेही शेअर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''या सिली मुव्हमेंट्सला सील करा.'' कामाचा विचार केला तर अनुष्का 'झीरो' या चित्रपटात शाहरुखसोबत झळकली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करु शकला नसला तरी यातील अनुष्काच्या भूमिकेचे कौतुक झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details