मुंबई- मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून आपण सर्वांनीच मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, त्यासाठी सर्वांनी लवकरात लवकर घराबाहेर पडा आणि मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी केले.
लवकर घराबाहेर पडा अन् मतदान करा, अभिनेते मिलिंद गुणाजी यांचे आवाहन
मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून आपण सर्वांनीच मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, त्यासाठी सर्वांनी लवकरात लवकर घराबाहेर पडा आणि मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी केले.
दुपारी मिलिंद गुणाजी यांनी वांद्रे पूर्व येथे असलेल्या नवजीवन विद्यामंदिर या शाळेत आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना राज्यातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन केले. आपण मतदान केले तरच आपल्याला सरकार निवडता येईल आणि चांगले लोक निवडता येतील, आणि त्यातून आपल्या राज्याच्या विकासाला गती येईल, असेही मत त्यांनी याेवळी व्यक्त केले.
यावेळी मिलिंद यांच्या पत्नी राणी गुणाजी यांनीही महिलांना मतदानासाठीआवाहन केले. सर्वच राजकीय पक्षांनी महिलांना कमी उमेदवारी दिली, यावर त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, आणि आपल्या प्रश्नासाठी आपण समोर यावे असे आवाहन त्यांनी केले.