महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'सुमन एंटरटेन्मेंट'च्या पहिल्या हिंदी गाण्यात झळकणार मराठी अभिनेत्री पूजा सावंत!

मराठी चित्रपटांतील आघाडीची अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) हिंदी चित्रपटांतूनही नायिकेच्या भूमिका साकारत असते. तिचा विद्युत जामवाल सोबतचा ‘जंगली’ (junglee) हा हिंदी चित्रपट समीक्षकांनी गौरविला होता. आता पूजा सावंत अजून एका हिंदी प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. एका हिंदी म्यूझिक व्हिडिओ(Hindi Music Video)मधून पूजा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'सुमन एंटरटेन्मेंट'(suman entertainment)च्या पहिल्या हिंदी गाण्यात ती झळकणार आहे.

पूजा सावंत
पूजा सावंत

By

Published : Nov 16, 2021, 8:57 PM IST

मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक नावे हिंदी माध्यमात आपले स्वतःचे स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहेत. मराठी चित्रपटांतील आघाडीची अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) हिंदी चित्रपटांतूनही नायिकेच्या भूमिका साकारत असते. तिचा विद्युत जामवाल सोबतचा ‘जंगली’ (junglee) हा हिंदी चित्रपट समीक्षकांनी गौरविला होता. आता पूजा सावंत अजून एका हिंदी प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. एका हिंदी म्यूझिक व्हिडिओ(Hindi Music Video)मधून पूजा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'सुमन एंटरटेन्मेंट'(suman entertainment)च्या पहिल्या हिंदी गाण्यात ती झळकणार आहे.

सुमन एंटरटेन्मेंट

'सुमन एंटरटेन्मेंट'ने मराठी भाषेत अनेक दर्जेदार गाण्यांची निर्मिती केली असून त्यांच्या प्रत्येक गाण्याला संगीत रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. ‘सुमन एंटरटेनमेंट'ने निर्मित केलेले प्रत्येक गाणे श्रवणीय असून त्यातील दृश्येही विलोभनीय आणि नजर खिळवून ठेवणारी असतात. अशा दर्जेदार गाण्यांची निर्मिती करणारे 'सुमन एंटरटेन्मेंट' आता हिंदीत पदार्पण करत आहे. त्यांच्या पहिल्या हिंदी गाण्यात मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत दिसणार आहे.

मराठी प्रमाणेच हिंदीतही दर्जेदार गाण्यांची निर्मिती करण्याचा 'सुमन एंटरटेन्मेंट'चे सर्वेसर्वा केदार जोशी यांचा मानस आहे. ‘सुमन एंटरटेन्मेंट'ची या पुढील गाणी जरी हिंदी असली तरी या गाण्यांसाठी प्राधान्य मराठी कलाकारांना देऊन, हे चेहरे जगभरात पोहोचवण्याचा या निर्मिती संस्थेचा प्रयत्न असणार आहे. तसेच लवकरच पंजाबी आणि गुजराती भाषांमध्ये देखील 'सुमन एंटरटेन्मेंट'ची उत्तम गाणी प्रेक्षकांना पाहायला आणि ऐकायला मिळणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details