मुंबई- अभिनेत्री प्रियांका चोप्रा लवकरच 'द स्काय इज' पिंक चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिचा हा सिनेमा सुरुवातीपासूनच चांगलाच चर्चेत राहिला. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलरमधून दाखवण्यात आलेली सिनेमाची झलक आणि कलाकारांचे अभिनय प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरले.
'द स्काय इज पिंक'च्या ट्रेलरमुळे प्रियांका अडचणीत? महाराष्ट्र पोलिसांचा आक्षेप
प्रेक्षकांना जरी हा ट्रेलर भावला असला, तरी पोलिसांनी मात्र यातील एका गोष्टीवर आक्षेप घेतला आहे. या ट्रेलरमध्ये प्रियांकाच्या तोंडी एक वाक्य आहे. 'एक बार आयशा ठीक हो जाए न, फिर साथ में हम बैंक लूटेंगे', असं प्रियांका यात म्हटली होती.
प्रेक्षकांना जरी हा ट्रेलर भावला असला, तरी पोलिसांनी मात्र यातील एका गोष्टीवर आक्षेप घेतला आहे. या ट्रेलरमध्ये प्रियांकाच्या तोंडी एक वाक्य आहे. 'एक बार आयशा ठीक हो जाए न, फिर साथ में हम बैंक लूटेंगे', असं प्रियांका यात म्हटली होती. तिच्या याच डायलॉगचं मीम शेअर करत महाराष्ट्र पोलिसांनी ट्विट केलं आहे. यासाठी सात वर्षांची शिक्षा आणि दंड होऊ शकतो, असं महाराष्ट्र पोलिसांनी म्हटलं आहे.
तर प्रियांकानेही यावर मजेशीर उत्तर दिलं आहे. तिनं महाराष्ट्र पोलिसांचे हे ट्विट रिट्विट करत म्हटलं, रंगे हात पकडलं....आता प्लॅन बी वर काम करण्याची वेळ आली आहे. दरम्यान सोनाली बोसद्वारा दिग्दर्शित हा चित्रपट आयशा चौधरी हिच्या जीवनावर आणि तिनं लिहिलेल्या ‘माय लिटिल एपिफेनिस’ या पुस्तकावर आधारित आहे. ऑक्टोबरमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.