महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कृती सेनॉनकडे दडपण घ्यायला किंवा भीती बाळगायलाही वेळ नाही

अभिनेत्री कृती सेनॉन आगामी वर्षात पाच चित्रपटातून झळकणार आहे. याचे तिच्यावर दडपण आहे का असे आपल्याला वाटेल. परंतू तिच्याकडे दडपण घ्यायला आणि भीती बाळगायलाही वेळ नाही.

By

Published : Feb 25, 2021, 4:18 PM IST

Breaking News

मुंबई - अभिनेत्री कृती सेनॉनचे आगामी वर्ष खूप बिझी असणार आहे. तिचे पाच चित्रपट यावर्षात रिलीज होतील. तिच्या चित्रपटाचे शूटिंग वेगवेगळ्या टप्प्यावर सुरू आहे.

पुढच्या काही महिन्यांमध्ये ती "बच्चन पांडे", "मिमी", "आदिपुरुष", "भेडिया" आणि "गणपत" या चित्रपटामध्ये दिसणार आहे. इतके चित्रपट असल्यामुळे तिच्यावर एक प्रकारचे दडपण असेल असेल असे आपल्याला वाटू शकेल मात्र दडपणासाठी किंवा घाबरायला तिच्याकडे वेळच नाही.

"मला असे वाटत नाही की तुम्ही घाबरेले आहात किंवा सावध आहात आणि तरीही तुम्हाला करियरमध्ये पुढे जायचे आहे. भीती तुम्हाला मागे खेचत असते. एकदा मला समजले की मी कशासाठी चित्रपट करीत आहे, त्यानंतर कोणतीही भीती राहिली नाही. तुम्हाला सिनेमा, कथानक, सीन आवडतो, तेव्हा तुम्हाला समजेल की तुम्ही काहीतरी वेगळे करीत आहात. हे प्रयोगात्मक असू शकेल परंतू त्याच कारणाने तुम्ही ते करीत असता'', असे कृती सेनॉन म्हणाली.

"मी आत्ता करत असलेल्या सर्व चित्रपटांवर माझा विश्वास आहे. त्यापलीकडे माझे काम खरोखर चांगले करणे आणि त्यासाठी कठोर परिश्रम करणे हे आहे. बाकीचे माझ्या हातात नाही. मला दडपण घ्यायचे नाही 'अरे काय चुकलं तर?' मी त्याऐवजी विचार करते की हे सर्व सुरळीत पार पडेल!!", असे कृती सेनॉन म्हणाली. तिने २०१४ मध्ये 'हिरोपंथी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

गेल्या सात वर्षांत कृतीने "दिलवाले", "राब्ता", ''बरेली की बर्फी "," लुका छुप्पी "आणि" पानिपत " या चित्रपटातून लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत.

हेही वाचा - परिणीती चोप्राच्या आईने चितारले लेकीच्या ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ चित्रपटाचे ‘पेंटिंग’!

ABOUT THE AUTHOR

...view details