मुंबई -कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाला एक आठवडा झाला आहे. राजस्थानमध्ये ९ डिसेंबरला या जोडप्याचा शाही विवाह पार पडला होता. कॅटरिना कौशल कुटुंबाची पूर्ण काळजी घेत आहे. कॅटरिनाच्या सासरच्या मंडळींना सरप्राईज देण्याचा सोहळाही शुक्रवारी पार पडला. या दिवशी कॅटरिनाने रव्याची खीर बनवून सासरच्या मंडळींना खाऊ घातली. आता कॅटरिना कामावर परतण्याच्या तयारीत आहे. कॅटरिनाचा पती विकी कौशल शुक्रवारीच कामावर परतला आहे.
कॅटरिना कैफने लग्नासाठी सलमान खान स्टारर चित्रपट 'टायगर 3' च्या शूटिंगमधून ब्रेक घेतला होता. तिने चित्रपटाचे पहिले दोन परदेशी शेड्युल पूर्ण केले आहे. मीडियानुसार, 'टायगर-3' चित्रपटाचे शूटिंग जानेवारीमध्ये दिल्लीत होणार आहे. कॅटरिनाने चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू करण्यासाठी पूर्ण तयारी सुरू केली आहे.
रिपोर्ट्सनुसार, कॅटरिना सलमान खानसोबत दिल्लीत जवळपास 15 दिवस शूटिंग करणार आहे. हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे, त्यामुळे आता चित्रपटाचे दिग्दर्शक मनीष शर्मा देखील वेगाने काम करण्याच्या मूडमध्ये आहेत. सलमान-कॅटरिना दिल्लीच्या खऱ्या लोकेशनवर जाऊनच शूटिंग करणार असल्याचं सांगण्यात येत आहे, याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे.