मुंबई- कॅटरिना आणि सलमानची जोडी त्यांच्या चाहत्यांसाठी नेहमीच खास आहे. या दोघांनीही लग्नगाठ बांधावी, असा चाहत्यांचा अट्टाहास असतो. अनेकदा दोघांच्या रिलेशनशिप विषयीही अनेक बातम्या समोर येत असतात. अशात आता सलमानच्या भावाने म्हणजेच अरबाजनेच कॅटरिनाला तिच्या लग्नाच्या प्लॅनविषयी विचारले आहे.
अरबाजने कॅटला विचारला लग्नाचा प्लॅन, तिने दिलं 'असं' उत्तर
कॅटरिना आणि सलमानच्या रिलेशनशिप विषयी अनेक बातम्या समोर येत असतात. अशात आता सलमानच्या भावाने म्हणजेच अरबाजनेच कॅटरिनाला तिच्या लग्नाच्या प्लॅनविषयी विचारले आहे
कॅटरिनाने नुकतीच अरबाज खानच्या 'पिंच' या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी अरबाजने तिला लग्नाविषयीचे प्लॅन विचारले. मात्र, कॅटरिनानेदेखील मोठ्या हुशारीने या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं. लग्न कधी करायचं याबद्दल मी अद्याप काही ठरवलं नाही. आयुष्य अनिश्चित असल्यामुळे मी आयुष्याचा प्रत्येक दिवस जगून घेत आहे. त्यामुळे, या सगळ्याबद्दल काहीही कल्पना नसल्याचे तिने म्हटले आहे.
दरम्यान कॅटरिना कैफ लवकरच 'भारत' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती सलमानसोबत स्क्रीन शेअर करणार असून येत्या ५ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. सलमान आणि कॅटरिनाचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.