महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

डिप्रेशनवरून कंगनाचा दीपिकावर निशाण; म्हणाली..

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचा खटला सीबीआयकडे वर्ग करण्याबाबत बुधवारी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला. कोर्टाने सांगितले की, तपास सीबीआयकडे सोपवावा. या निर्णयानंतर अभिनेत्री कंगना रनौतने दीपिका पादुकोणवर टीका केली. कंगनाने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, माझ्या मागे म्हणा, डिप्रेशनचा धंदा करणाऱ्यांना जनतेने त्यांची जागा दाखवली.

Kangana Ranaut and Deepika Padukone
कंगनाचा दीपिकावर निशाणा

By

Published : Aug 20, 2020, 6:39 PM IST

मुंबई -अभिनेत्री कंगना रनौत सुरुवातीपासूनच सुशांतसिंह राजपूत प्रकरणात खूप सक्रिय आहे. या प्रकरणात तिने सातत्याने मोठी विधाने केली आहेत आणि बॉलिवूडच्या एका घटकाला जोरदार लक्ष्य केले आहे. अशा परिस्थितीत जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने हा खटला सीबीआयकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे, तेव्हा कंगना काही सेलिब्रिटींना लक्ष्य करीत आहे. याचा भाग म्हणून तिने दीपिका पादुकोणवर निशाणा साधला आहे.

सुशांतच्या निधनानंतर दीपिकाने सोशल मीडियावर औदासिन्याबाबत अनेक पोस्ट्स शेअर केल्या. त्याने लोकांना दुःख आणि नैराश्यातला फरक सांगितला. आता यासंदर्भात कंगना रनौतने दीपिकावर टीका केली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, दीपिका उदास होती, याचा अर्थ असा नाही की सुशांत देखील त्याच परिस्थितीतून गेला आहे.

तिने ट्विट करून लिहिलंय, 'सत्य हे आहे की मानसिक आजाराचा पुरावा नाही. एक महान कलाकार किंवा माणसाचे भावनिक लिंचिंग का केले जाते. जर 10 वर्षांपूर्वी ब्रेकअपमुळे दीपिका उदास होती तर आम्ही विश्वास ठेवला. पण नंतर मला आणि सुशांतलाही तो सन्मान मिळायला हवा. जर मी असे म्हणत आहे की मी उदास नाही, तर सुशांतचे वडील जर आपला मुलगा उदास नसल्याचे सांगत असतील तर त्यावर विश्वास ठेवा. आपल्यावर रोग का लादला जात आहे?

याआधी कंगनाने एक टिप्पणी लिहिली होती की, 'माझ्यापाठोपाठ म्हणा, जनतेने औदासिन्याच्या व्यवसायाला त्यांची जागा दाखवली आहे.'

कंगनाचे ट्विट दीपिकाच्या ट्विटशी जोडले जात आहे, दीपिकाने म्हटले होते की, आपण डिप्रेशनपासून पळून जाऊ शकत नाही.

याआधी कंगनाने सुशांत प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचेही उघडपणे स्वागत केले होते. या प्रकरणात मानवतेचा विजय झाला असे ती म्हणाली होती. त्यांनी सुशांतच्या सर्व चाहत्यांचे आभारही मानले. सुशांत प्रकरणात सीबीआय चौकशीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details