मुंबई - अलिकडेच रिलीज झालेल्या 'तानाजी: द अनसंग वॉरियर' चित्रपटात उदयभान राठोडची भूमिका साकारलेला सैफ अली खान सध्या खूप चर्चेत आहे. त्याचा 'जवानी जानेमन' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. यातील 'जीने मेरा दिल लुटया' हे गाणे लॉन्च करण्यात आले. यावेळी सैफने आपल्या जवानीची चर्चा केली.
सैफला एकाने विचारले की जवानी ढळण्याच्या विचारांची भीती वाटतेय का ? उत्तर सैफने फार मजेशीर दिले.
सैफ म्हणाला,नाही, ''जवानी कधीचीच ढळलीय यार. मला भीती नाही वाटत. मी कधी याचा विचारही केला नाही. तुम्ही जर मनाने जवान असाल तर जवानी अनुभवू शकता. ही ठिक आहे की, मला जास्तकाळ जवानही राहायचं नाही आणि म्हतारेही व्हायचे नाही. मी माझ्या आयुष्यात खूश आहे.''
सैफ पुढे म्हणाला, ''मी आणि तैमुर नेहमी एकाच क्लबमध्ये जातो आणि दोघांनाही एकच मुलगी आवडते. तेव्हा मी त्याला उचलून घरी पाठवून देतो. इब्राहिम मोठा असल्यामुळे त्याच्यासोबत मी असे करु शकत नाही. बॅलन्स होऊन जातो. मला वाटते पब्जमध्ये मुलींना आता इब्राहिमसाठी सोडून दिले पाहिजे आणि तैमुरसोबत घरी बसले पाहिजे. मी आता म्हातारा झालोय, फक्त कुल राहण्याचा प्रयत्न करतोय.''
'जवानी जानेमन' चित्रपटात सैफ अली एका वडिलाची भूमिका साकारत आहे. यात त्याची मुलगी बनलीय पूजा बेदीची मुलगी आलिया. आलियाचा हा पहिलाच सिनेमा आहे. चित्रपटात तब्बू महत्त्वाच्या भूमिकेत आहे. नितिन कक्कड यांनी दिग्दर्शित केलेला 'जवानी जानेमन' हा चित्रपट ३१ जानेवारी २०२० ला रिलीज होणार आहे.