महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात कलाकारांचा हातभार, जागतिक कोरोना सहाय्यता कार्यक्रमात सहभागी

ओएचएम या लाईव्ह कार्यक्रमाचं आयोजन सर्व खबरदारी घेऊन केलं आहे, ज्यात प्रत्येक क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती भाग घेतील. भारतातून करण जोहर, सोनम, राजा कुमारी, मल्लिका दुआ, माहिरा खान आणि अली जाफर एका खास भागातून अमांडा सेर्नी आणि जॅकलिन यांच्यासह पडद्यावर येतील. हे यूट्यूब, फेसबुक, आयजीटीवी, टिकटॉक या वेबसाईटवर स्ट्रीम केलं जाईल.

24-hr global COVID relief gala
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात कलाकारांचा हातभार

By

Published : May 27, 2020, 8:28 AM IST

मुंबई - कोरोनासोबत लढा देण्यासाठी कलाकारही पुढे सरसावले आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढण्यासाठी सहाय्यता निधी जमा करण्यासाठी हे कलाकार मदत करत आहेत. अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस, सोनम कपूर आणि करण जोहर हेदेखील या अभियानाचा भाग असणार आहेत. 'वनह्युमैनिटी' या 24 तासांच्या लाईव्ह ब्रॉडकास्ट कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. यात इतरही 150 ग्लोबल स्टार असणार आहेत.

हा कार्य़क्रम 29 मे रोजी आयोजित केला गेला आहे. यात डुआ लिपा, जेसन डेरुलो, रोनेन कीटिंग यांच्यासारखे सेलिब्रिटी सहभागी होतील. हे सर्व लोकांना कोरोना महामारीच्या दरम्यान एकता, आशा आणि सकारात्मकतेचा संदेश देणार आहेत.

कार्यक्रमाच्या आयोजकांनी म्हटलं आहे, की ओएचएम या लाईव्ह कार्यक्रमाचं आयोजन सर्व खबरदारी घेऊन केलं आहे, ज्यात प्रत्येक क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती भाग घेतील. भारतातून करण जोहर, सोनम, राजा कुमारी, मल्लिका दुआ, माहिरा खान आणि अली जाफर एका खास भागातून अमांडा सेर्नी आणि जॅकलिन यांच्यासह पडद्यावर येतील. हे यूट्यूब, फेसबुक, आयजीटीवी, टिकटॉक या वेबसाईटवर स्ट्रीम केलं जाईल. याचे प्रसारण भारतात 3 तासांच्या प्राईम टाईमदरम्यान व्हीएच 1 आणि कलर्स इन्फिनिटीवर केले जाईल.

ABOUT THE AUTHOR

...view details