मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची आई किम फर्नांडिस यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जॅकलिनचे आई-वडील बहरीनमध्ये राहतात. जॅकलीन सध्या तिच्या कामानिमित्त मुंबईत आहे. मात्र, जॅकलीनला तिच्या आजारी आईला भेटायला जाता येईल की नाही हे अद्याप कळू शकलेले नाही. कारण ईडीने तिला देश सोडण्यास बंदी घातली आहे.
विशेष म्हणजे जॅकलीनला कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा करायला जायचे होते. पण ईडीने तिला परवानगी दिली नाही. 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगचा आरोपी सुकेश चंद्रशेखरसोबत जॅकलिनचे संबंध ईडीच्या तपासात समोर आले आहेत. याप्रकरणी जॅकलिनची ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीही केली आहे.