मुंबई- अभिनेता ईशान खट्टरने 'धडक' चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली. यानंतर ईशान सतत चर्चेत राहिला. दरम्यान नुकतंच एका चॅट शोमध्ये हजेरी लावली असता ईशानने अनेक गोष्टींचा खुलासा केला. या चॅट शोमध्ये ईशानसोबतच अभिनेता राजकुमार रावनेदेखील हजेरी लावली होती.
शाहिदची 'ही' एक्स गर्लफ्रेंड आहे ईशानची खास मैत्रीण
शाहिद मीरा कपूरसोबत विवाहबंधनात अडकण्याआधी प्रियांका चोप्रासोबत रिलेशनशिपमध्ये होता. काही काळ हे कपल चांगलेच चर्चेत होते. मात्र, काही काळातच हे नाते तुटले.
दरम्यान शाहिदच्या एक्स गर्लफ्रेंड्सपैकी तुला कोण सर्वात जास्त आवडते, असा प्रश्न ईशानला केला गेला. या प्रश्नाचे उत्तर देताना एका कुणाचे नाव घेणे आपल्यासाठी कठीण असल्याचे म्हणत प्रियांका चोप्रासोबत आपले खास मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे ईशानने म्हटले आहे.
शाहिद मीरा कपूरसोबत विवाहबंधनात अडकण्याआधी प्रियांका चोप्रासोबत रिलेशनशिपमध्ये होता. काही काळ हे कपल चांगलेच चर्चेत होते. मात्र, काही काळातच हे नाते तुटले. आता प्रियांकाने निक जोनास तर शाहिदने मीरासोबत लग्नागाठ बांधली आहे.