मुंबई - प्रियदर्शन यांच्या हंगामा - 2 या हास्य चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी परेश रावल, शिल्पा शेट्टी व मिझान यांनी आज (दि. 4 ऑक्टोबर) मुंबईतून हिमाचल प्रदेशच्या मनालीसाठी प्रस्थान केले आहे. 2003 साली आलेल्या हंगामा या कॉमेडी चित्रपटाचा सिक्वल लवकरच सिनेरसिकांच्या भेटीला येणार आहे. 2003 सालच्या हंगामा चित्रपटातही परेश रावल यांनी काम केले होते.
शिल्पा शेट्टी-कुंद्राने एक व्हिडिओ तिच्या इन्साग्रामवर पोस्ट केला आहे. त्यामध्ये अभिनेते परेश रावल, प्रणिता सुभाष तसेच निर्माते रतन जैन हे दिसत आहेत. कोरोनाचे नियम पाळत मास्क लावत हे हंगामा चित्रपटाची टीमने एका खासगी हेलिकॉप्टरने मनालीकडे झेप घेतली.