मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री अनेकदा सोशल मीडियावर तिच्या फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत राहते. भाग्यश्रीने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. या व्हिडिओमध्ये ती आपल्या सुट्टीचा आनंद लुटताना दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये भाग्यश्रीने लिहिले की हा आठवडा खूप रिफ्रेश होता. लॉकडाऊनमुळे गेल्या दीड वर्षात बरीच चिंता आणि तणाव निर्माण झाला आहे. त्यासाठी तुम्हाला थोडी विश्रांती घ्यावी लागेल. शहरी जीवन जगणे आणि निसर्गासोबत जगणे ही वेगळी बाब आहे.
मितवाच्या गाण्यावरील डान्सचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे