महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

जेनेलिया-रितेश देशमुखने ‘जाने तू या जाने ना’चा मजेशीर डायलॉग केला रिक्रिएट

अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांचा एक व्हिडिओ सध्या खूप चर्चेत आहे. या मिश्किल व्हिडिओला चाहत्यांनी भरपूर प्रतिसाद दिला आहे.

Genelia-Riteish Deshmukh
जेनेलिया-रितेश देशमुख

By

Published : Jul 10, 2021, 7:02 PM IST

मुंबई- बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख काही काळ चित्रपटांपासून दूर असला तरी त्याची सोशल मीडियावरील हजेरी कामय असते. तो नेहमी पोस्ट लिहून, फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. तो त्याच्या मिश्किलपणासाठीही ओळखला जातो. सध्या त्याचा पत्नी जेनेलियासोबतचा एक व्हिडिओ चाहत्यांना आवडलाय.

या व्हिडिओमध्ये सुरुवातीला जेनेलिया तिच्या 'जाने तू या जाने ना' या चित्रपटातील डायलॉग बोलताना दिसते. यात ती म्हणते, ‘कॉलेज के 5 साल कहां निकल गए पता ही नहीं चला'. त्यावर रितेश म्हणतो, 'रील्स पे बीटा रील्स पे'. रितेश आणि जेनेलियाचा हा मजेदार व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांना खूपच आवडला असून त्यावर त्यांनी जोरदार भाष्य केले आहे. व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका युजरने लिहिले आहे की, 'आज कोणतेही जेवण मिळणार नाही'. या व्हिडिओला आतापर्यंत ५लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा ही जोडी 2003 मध्ये आलेल्या 'तुझे मेरी कसम' या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र दिसली होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमधील प्रेम सुरू झाले. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर या जोडप्याने २०१२ साली लग्न केले. आज त्यांच्या सुखी संसारात दोन मुले आहेत.

हेही वाचा - अखेर ठरलं : विक्रम वेधाच्या हिंदी रिमेकमध्ये हृतिक रोशन आणि सैफ अली खान साकारणार मुख्य भूमिका

ABOUT THE AUTHOR

...view details