महाराष्ट्र

maharashtra

'पी.एम. मोदी' चित्रपटाला निवडणूक आयोगाचा दणका; १९ मे पर्यंत होणार नाही प्रदर्शित

बऱ्याच दिवसांपासून 'पी.एम. मोदी' या बायोपिकची चर्चा सुरू आहे. मात्र, निवडणुकीच्या धामधुमीत या चित्रपटाचे प्रदर्शन रोखले गेले. एप्रिल महिन्यातच हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार होता.

By

Published : Apr 25, 2019, 1:51 PM IST

Published : Apr 25, 2019, 1:51 PM IST

'पी.एम. मोदी' चित्रपटाला निवडणूक आयोगाचा दणका; १९ मे पर्यंत होणार नाही प्रदर्शित

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित पी. एम. मोदी बायोपिकच्या प्रदर्शनाबाबत अनेक दिवसांपासून तर्कवितर्क सुरू आहेत. अनेकदा या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली गेली. शेवटी निवडणूक आयोगाकडे या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा निर्णय सोपविण्यात आला होता. अखेर निवडणूक आयोगानेही हा चित्रपट १९ मे पर्यंत प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे.

बऱ्याच दिवसांपासून 'पी.एम. मोदी' या बायोपिकची चर्चा सुरू आहे. मात्र, निवडणुकीच्या धामधुमीत या चित्रपटाचे प्रदर्शन रोखले गेले. एप्रिल महिन्यातच हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार होता. मात्र, आता हा चित्रपट १९ मे नंतर प्रदर्शित केला जाणार आहे.

अभिनेता विवेक ओबेरॉय या चित्रपटात नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेत झळकणार आहे. ओमंग कुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details