महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

''तुझ्या लग्नच करायचे नाही'', म्हणत 'त्याने' शेवटच्या क्षणी तोडले होते नीना गुप्ताचे लग्न

आपल्या आयुष्यात अनेक चढ उतार सहन केल्यानंतर अभिनेत्री नीना गुप्ता आपले वैवाहिक जीवन आनंदात जगत आहे. आपल्या पूर्वआयुष्यातील आठवणींना उजाळा देताना तिने सांगितले की ती विवाह करणार होती परंतु त्या व्यक्तीने ऐनवेळी लग्न करण्ययास नकार दिला होता.

Neena Gupta
नीना गुप्ता

By

Published : Jun 16, 2021, 10:36 PM IST

मुंबई - एकटी पालक म्हणून मुलीचे संगोपन करणारी अभिनेत्री नीना गुप्ता हिने आपल्या पूर्वायुष्यातील अनेक रहस्यांचा उलगडा केला आहे. लग्नासाठी दिल्लीस गेलेली असताना तिच्या एका एक्स बॉयफ्रेंडने तिला धोका दिला होता, ही आठवणही सांगितली.

ऐंशीच्या दशकात वेस्ट इंडीजचा माजी क्रिकेटपटू विव्हियन रिचर्ड्स यांच्याशी अल्प संबंधानंतर नीना गुप्ता हिने मसाबा या मुलगीला जन्म दिला. त्यानंतर तिने दिल्ली स्थित सीए विवेक मेहराशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता तिचे विवेकशी आनंदाने लग्न झाले आहे आणि उत्तराखंडमधील मुक्तेश्वर येथे हे जोडपे अनेक वेळा सुट्टीचा आनंद घेत असते. परंतु तिचा वैवाहिक आनंद अनेक चढ उतारातून गेला आहे.

अभिनेत्री नीना गुप्ताने अलीकडेच 'सच कहूं तो' हे आत्मचरित्र प्रकाशित केले आहे. पुस्तक प्राशनाच्या वेळी नीनाने आपल्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यातील अनेक रहस्यांचा भेद केला आहे.

मी दिल्लीत माझे कपडे बनवण्यासाठी गेलेली असताना त्याने बोलवले आणि सांगितले की, ''मला तुझ्याशी लग्न करायचे नाही.'' त्यावेळी मला माहिती नाही का पण मी काय करु शकत होते? मी पुढे गेले. मला त्याच्याशी लग्न करायला आवडले असते. मला त्याच्या वडिलांचा आणि आईचा खूप आदर होता; मी त्यांच्या घरात राहत होते. तो आता जिवंत आहे, त्याने आनंदाने लग्न केले आहे आणि त्याला मुले आहेत. "

कामाच्या पातळीवर नीना गुप्ता यांना 'सरदार का ग्रँडसन' या चित्रपटात अखेरचे पाहिले होते. अमिताभ बच्चन यांच्या आगामी 'गुडबाय' या चित्रपटात ती बच्चनच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे.

हेही वाचा - ‘रामायण’ मालिकेतील 'आर्य सुमंत' ज्येष्ठ अभिनेता चंद्रशेखर कालवश

ABOUT THE AUTHOR

...view details