मुंबई- बॉलिवूड दिग्दर्शक अहमद खान याने त्याची पत्नी शायरा अहमद खान हिला बॅटमोबाईल कार भेट दिली. ऑटोमोबाईलच्या फॅन्सी पीसची किंमत वरवर पाहता 3 कोटी रुपये आहे. 'आपले स्वप्न साकार झाले', असे म्हणत शायरा हिने सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे.
शायराने काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर अनेक फोटो शेअर केले आहेत जे आता व्हायरल होत आहेत. फोटो शेअर करत शरियाने लिहिले, "थँक्यू लव्ह"
शायरा खानच्या या सोशल मीडिया पोस्टला बॉलिवूड सेलेब्रिटीजकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला आहे. यात दिशा पटानी, एली अव्राम, टायगर श्रॉफची आई आयेशा श्रॉफ आणि इतर बॉलिवूड सेलिब्रिटीजचा समावेश आहे.
सायरा खानला पतीकडून भेट म्हणून मिळालेली कार ही 1989 च्या बॅटमॅन आणि 1992 च्या बॅटमॅन रिटर्न्समध्ये अभिनेता मायकेल कीटन यांनी चालवलेल्या बॅटमोबाईलची प्रतिकृती आहे. मिळालेल्या माहितीनुसार या कारसाठी भरपूर इंधनाची गरज असते.
दरम्यान, अहमद खान आगामी हिरोपंती 2 चे दिग्दर्शन करणार आहे. यात टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत असेल. तो आदित्य रॉय कपूर आणि संजना संघीच्या 'ओम - द बॅटल विदिन' या चित्रपटातही काम करत आहे.