मुंबई- बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सनी देओलने नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. पंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार आहेत. सनी देओलच्या भाजप प्रवेशानंतर चाहत्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. राजकारण हे घाणेरडं आणि वाईट आहे आणि सनी देओल एक स्वच्छ मनाचा माणूस तरीही त्याने राजकारणात प्रवेश का केला, असे प्रश्न समोर येत होते.
सनी देओल चांगला, तर राजकारणात प्रवेश का केला? गदरच्या दिग्दर्शकानं दिलं उत्तर..
. राजकारण हे घाणेरडं आणि वाईट आहे आणि सनी देओल एक स्वच्छ मनाचा माणूस तरीही त्याने राजकारणात प्रवेश का केला, असे प्रश्न समोर येत होते.
सनी देओलच्या राजकारणातील प्रवेशावर अनिल शर्मांची प्रतिक्रिया
या प्रश्नांना आता गदर चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी उत्तर दिले आहे. राजकारण घाणेरडं आहे आणि सनी एक चांगला व्यक्ती आहे, हे खरं आहे. मात्र, प्रत्येक चांगल्या व्यक्तीनं असाच विचार केला तर राजकारणाला शुद्ध कोण बनवेल? असा सवाल अनिल शर्मा यांनी केला आहे.
या अंधारातून बाहेर येण्यासाठी कोणाची तरी गरज आहे, म्हणूनच सनी देओलने राजकारणात प्रवेश केल्याचे अनिल शर्मा यांनी म्हटले आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून अनिल शर्मा यांनी हे ट्विट शेअर केलं आहे.