मुंबई- आपल्या भारदस्त आवाजाने आणि अभिनयानं बॉलिवूडवर अधिराज्य गाजवाणारे बिग बी आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत. लवकरच ते एका तामिळ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाबद्दलची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. आता याचं शीर्षकही निश्चित झालं आहे.
'तेरा यार हूँ मैं'! अमिताभच्या हिंदी-तामिळ चित्रपटाचं शीर्षक निश्चित
'तेरा यार हूँ मैं' असं या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनचं शीर्षक असणार आहे. चित्रपटाच्या सेटवरील अमिताभ यांचे अनेक फोटो समोर आले आहेत
'तेरा यार हूँ मैं' असं या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनचं शीर्षक असणार आहे. चित्रपटाच्या सेटवरील अमिताभ यांचे अनेक फोटो समोर आले आहेत. हे फोटो आणि चित्रपटाचं शीर्षक पाहता यात वडिल आणि मुलातील मैत्रीचं नातं उलगडणार असल्याचं दिसत आहे. या फोटोंमध्ये अमिताभ दाक्षिणात्य वेशभूषेत आहेत.
चित्रपटात अमिताभ यांच्याशिवाय एस जे सूर्या आणि राम्या कृष्णन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. भूषण कुमार, दिव्या खोशला कुमार, क्रिशन कुमार, ओम प्रकाश भट्ट, सुजय शंकरवार आणि अमी त्रिवेदी यांची निर्मिती असणार आहे. तमिलवानन दिग्दर्शित हा चित्रपट हिंदी आणि तामिळमध्ये प्रदर्शित होईल.