मुंबई- बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार लवकरच 'मिशन मंगल' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच दिवशी जॉन अब्राहमचा 'बाटला हाऊस'ही प्रदर्शित होणार आहे. या क्लॅशबद्दलच्या प्रश्नावर अक्षयने गणिती भाषेत उत्तर देत जॉन आणि आपल्यामध्ये मैत्रीपूर्णसंबंध असल्याचे सांगितले.
'बाटला हाऊस'सोबतच्या क्लॅशवर अक्षय म्हणतो, वर्षात ५२ शुक्रवार अन् २०० चित्रपट
गेल्या वर्षीही अक्षयचा 'गोल्ड' आणि जॉनचा 'सत्यमेव जयते' हे दोन्ही चित्रपट स्वातंत्र्यदिनीच प्रेक्षकांच्या भेटीला आल्याने या चित्रपटांमध्ये ऑफिसवर क्लॅश पाहायला मिळाला. यावर उत्तर देताना अक्षय म्हणाला, वर्षात केवळ ५२ शुक्रवार असतात तर किमान २०० सिनेमे वर्षभरात प्रदर्शित होतात.
विशेष म्हणजे गेल्या वर्षीही अक्षयचा 'गोल्ड' आणि जॉनचा 'सत्यमेव जयते' हे दोन्ही चित्रपट स्वातंत्र्यदिनीच प्रेक्षकांच्या भेटीला आल्याने या चित्रपटांमध्ये ऑफिसवर क्लॅश पाहायला मिळाला. यावर उत्तर देताना अक्षय म्हणाला, वर्षात केवळ ५२ शुक्रवार असतात तर किमान २०० सिनेमे वर्षभरात प्रदर्शित होतात. अशात बॉक्स ऑफिसवर सिनेमांचे क्लॅश होणारच.
तिन्ही खानने दिवाळी, ईद आणि ख्रिसमसच्या तारखा प्रत्येक वर्षी आपल्या नव्या चित्रपटांसाठी बुक केलेल्या असतात. असेच अक्षयने प्रत्येक स्वातंत्र्यदिनी चित्रपट प्रदर्शित करण्याला पसंती दिली आहे का? असा सवाल केला असता अक्षय म्हणाला, यामागे असं काहीही कारण नाही. माझे जे चित्रपट देशावर आधारित असतात ते स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित केले जातात. मिशन मंगलही असाच चित्रपट असून भारतासाठी अभिमानाची असलेल्या मंगळ मोहिमेवर तो आधारित आहे.