महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'कबीर सिंह'नंतर आता 'डियर कॉम्रेड'ही झळकणार हिंदीमध्ये !

'कबीर सिंह' चित्रपटानंतर आता 'डियर कॉम्रेड' या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनणार आहे. ही माहिती करण जोहरने दिलीय.

By

Published : Jul 24, 2019, 3:20 PM IST

'डियर कॉम्रेड'ही झळकणार हिंदीमध्ये


मुंबई - 'कबीर सिंह' चित्रपटाला प्रचंड यश मिळाले. 'अर्जुन रेड्डी' या चित्रपटाचा तो हिंदी रिमेक होता. 'अर्जुन रेड्डी'मध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवराकोंडा याची प्रमुख भूमिका होती. आता त्याच्या 'डियर कॉम्रेड' चित्रपटाचाही हिंदी रिमेक होणार आहे. ही माहिती निर्माता करण जोहरने इन्स्टाग्रामवरुन दिली आहे.

विजय देवराकोंडा याचा 'डियर कॉम्रेड' हा चित्रपट २६ जुलैला रिलीज होणार आहे. अलिकडेच याचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. याला करण जोहर उपस्थित होता. करणला चित्रपट इतका पसंत आला की त्याने याचा रिमेक हिंदीत करण्याचा निर्णय घेतलाय.

विशेष म्हणजे या हिंदी रिमेकमध्ये विजय देवराकोंडा याचीही भूमिका असणार असल्याचे करण जोहरने घोषित केले आहे. करण जोहरने लिहिलंय, ''मी डियर कॉम्रेड सर्वात अगोदर पाहिला. ही एक जबरदस्त आणि गंभीर प्रेम कथा आहे. यात विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी सुंदर काम केले आहे. हा चित्रपट एक महत्त्वाचा संदेशही देतो. 'धर्मा प्रॉडक्शन' याचा हिंदी रिमेक बनवत आहे हे सांगताना खूप आनंद होतो. यासाठी मी खूप उत्सुक आहे.''

ABOUT THE AUTHOR

...view details