सॅनफ्रानिस्को - इलेक्ट्रिक कारची जगभरात प्रथम सुरुवात करणाऱ्या टेस्लाने कारमध्ये महत्त्वाचे फिचर आणले आहे. जेव्हा कारवर लावलेल्या कॅमेराला रस्त्यातील वेग मर्यादेचे चिन्ह दिसते, ते ड्रायव्हरच्या व्हिझ्युलायझेशनच्या दाखविते. त्यामुळे चालकांना विना अपघात व नियमांचे पालन करत वाहन चालविणे शक्य होणार आहे.
टेस्ला कारमधील 'स्पीड असिस्ट' हे तुम्हाला वाहनाच्या वेगाचा मर्यादा नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करणार आहे. या कारमधील कॅमेऱ्यामधून वेग मर्यादाचे चिन्ह शोधणे शक्य आहे. हे चिन्ह वाहनचालकाला समोरील स्क्रिनवर दिसणार असल्याचे टेस्ला कंपनीने म्हटले आहे.