सॅन फ्रांन्सिस्को: गूगल आपलेइन-हाउस स्मार्टवॉच (Google Pixel Watch) मे महिण्यात 26 तारखेला लॉन्च करु शकते. याच्या लॉन्चिंग संदर्भात जाने-माने टिपस्टर जॉन प्रोसरने ही बातमी लिक केली आहे. टिपस्टर जॉन प्रोसरचे म्हणने आहे की, गूगल आपल्या तारखांमधील बदलांसाठी ओळखले जाते. परंतु आता त्यांनी लॉन्चिंगच्या तारखेमध्ये काही बदल केले तर त्याची माहिती आम्हाला मिळेल.
गूगल पिक्सेल स्मार्ट वॉच अनेक वैशिष्ट्यांनी सुसज्ज असल्याचे सांगितले जाते. पिक्सेल स्मार्ट वॉचमध्ये (Google Pixel Smart Watch) बऱ्याच अशा सुविधा आहेत, ज्या दुसऱ्या वेटर ओएस घड्याळात नाहीत. ही गूगल असिस्टेसंची पुढची पिढी आहे. असे मानले जात आहे की, गूगल पिक्सेल वॉच Apple Watch 7, सॅमसंग गॅलेक्सी वॉच 4 आणि बाजारातील इतर सर्व खास घड्याळांना टक्कर देऊ शकते.
संभावना आहे की गूगल आपल्या स्मार्ट वॉचसाठी Exynos- आधारित Tensor चिप सोबत जाऊ शकते. आता गूगल पिक्सल 6 डिवाइस Tensor GS 101 चिपसेटचा वापर करत आहेत. जे मूळ रुपाने हार्डवेयरला उत्तम बनवणारा Exynos आहे. याच्या फिचर लिस्टमध्ये स्टेप काउंटिंग, SPO2 (ऑक्सीजनेशन) ट्रॅकिंग, स्लीप एपनिया डिटेक्शन, स्लीप एनालिसिस, हार्टबीट मॉनिटर, रिकवरी टाइम मॉनिटरिंग, स्ट्रेस ट्रॅकिंग, मेडिकल डिवाइसेज आणि जिम इक्विपमेंटची पेयरिंग, रेप डिटेक्शन आणि कॅलोरी ट्रॅकिंग सारख्या गोष्टी समाविष्ट असू शकतात.
टिपस्टर जॉन प्रोसरच्या लीकवर गूगलकडून कोणतेही अधिकृतपणे प्रतिक्रिया आलेले नाही. गूगल अगोदर ही इन-हाउस स्मार्टवॉचबद्दलच्या अटकळांना खारिज केले आहे. परंतु टिपस्टर जॉन प्रोसरच्या सूचना नेहमी खऱ्या ठरत आल्या आहेत, त्यामुळे असे मानले जात आहे की, मे महिण्यात गूगलचे स्मार्टवॉच (Google Pixel Watch) मार्केटमध्ये येऊ शकते.