महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / opinion

कोरोनानंतर नव्या नोकरीची संधी आणि करियर

'वर्क फ्रॉम होम'च्या सकारात्मक अनुभवानंतर अनेक कंपन्या कामाच्या ठिकाणांमध्ये लवचिकता आणण्याच्या विचारात आहेत. मॅकिन्सेने 278 कंपन्यांचा ऑगस्टमध्ये अभ्यास केल्यावर असे लक्षात आले की या संस्थांनी आपल्या कार्यालयाचा आकार ३० टक्क्याने कमी करण्याचा विचार पक्का केला आहे.

By

Published : Apr 3, 2021, 3:17 PM IST

कोरोनानंतर नव्या नोकरीची संधी आणि करियर
कोरोनानंतर नव्या नोकरीची संधी आणि करियर

गेल्यावर्षी कोरोनामुळे नोकऱ्यांच्या जागतिक परिस्थितीत विस्कळीतपणा आला. लक्षावधी लोकांनी त्यांची नोकरी गमावली, इतरांनी घरूनच काम करण्याचा पर्याय स्वीकारला, कारण कार्यालये बंद करण्यात आली होती. जिथे थेट शारीरिक संपर्क येते अशा नोकऱ्यांवर सर्वाधिक विपरित परिणाम झाला. कोरोनामुळे जगभरातील २५ टक्के लोकांना त्यांचा नोकरीचा पर्यायच बदलावा लागला. या परिस्थितीमुळे नवीन तंत्रज्ञान, नवीन प्रकारच्या नोकऱ्या, ज्यामध्ये यांत्रिकीकरण, डिजीटल तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धीमत्तेचा समावेश होतो यांच्या भरभराटीला वेग आला. नव्या परिस्थितीत भविष्यातील काम किंवा नोकऱ्यांचा विचार केला तर त्यामध्ये नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी विविध कौशल्ये, ज्यामध्ये तांत्रिक कौशल्ये, विशेष औद्योगिक कौशल्ये तसेच बिझनेसचे ज्ञान असणे गरजेचे झाले आहे. लॉकडाऊन लागल्यापासून आपण ज्याप्रकारे काम केले, शिकलो, खरेदी केली, सामाजिक अंतर राखले आणि करमणुकीची साधने वापरली त्याचा भविष्यातही वापर करावा लागणार आहे.

कोरोनाच्या महासाथीमुळे नवीन ट्रेंड आले, त्यामध्ये घरून काम, ई-कॉमर्स, ऑनलाईन बैठका, ऑनलाईन शिक्षण आणि इतर बाबींचा जगभर समावेश होतो. आता अनेक कंपन्या नवीन पर्यायाचाही विचार करत आहेत, ज्यामध्ये काही कर्मचारी घरीच राहून काम करतील आणि काही कर्मचारी कार्यालयात येतील. या नव्या प्रणालीमुळे मोठ्या प्रमाणात चांगले मनुष्यबळ, निर्मितीक्षमतेमध्ये वाढ, छोट्या प्रमाणातील कर्मचारी, कमी खर्च त्याचवेळी लवचिकता असेल. नेचर या नियतकालिकाच्या सर्वेक्षणानुसार या महासाथीनंतरही अशाच प्रकारे आभासी अर्थात ऑनलाईन बैठका सुरू राहतील असा विचार तज्ज्ञ करत आहेत.

"कोविड -१९ नंतरच्या कामाचे भविष्य" यासंबंधी नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या मॅकिन्सेच्या अहवालानुसार चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, जपान, स्पेन, ब्रिटन आणि अमेरिका या देशातील १०० दशलक्ष लोकांना म्हणजेच दर १६ पैकी १ कर्मचाऱ्याला वेगळा व्यवसाय शोधण्याची गरज लागेल. या सर्वच देशांमध्ये जवळ-जवळ जगाची अर्धी लोकसंख्या येते आणि जागतिक दरडोई उत्पन्नाच्या ६२ टक्के हिस्सा या देशांचा आहे. कोविड संकटामुळे २०३० पर्यंत १.८ कोटी भारतीयांना नवीन नोकरी शोधावी लागणार आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

'वर्क फ्रॉम होम'च्या सकारात्मक अनुभवानंतर अनेक कंपन्या कामाच्या ठिकाणांमध्ये लवचिकता आणण्याच्या विचारात आहेत. मॅकिन्सेने 278 कंपन्यांचा ऑगस्टमध्ये अभ्यास केल्यावर असे लक्षात आले की या संस्थांनी आपल्या कार्यालयाचा आकार ३० टक्क्याने कमी करण्याचा विचार पक्का केला आहे. त्यामुळे रेस्टॉरंट आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची मागणी त्याच प्रमाणात कमी होईल. मॅकिन्सेच्या सर्वेक्षणानुसार हवाई वाहतूक कंपन्यांचा एक प्रमुख व्यवसाय असणारा २० टक्के व्यावसायिक प्रवासाचा भाग कमी होईल. याचा परिणाम विमानतळ, विमान वाहतूक कंपन्या, त्यांना अन्न पुरवणाऱ्या कंपन्या आणि इतर सेवा यावर निश्चित होईल. दुसरीकडे व्हर्च्युअल व्यवहारामध्ये वाढ होईल, त्यामध्ये टेलिमेडिसीन, ऑनलाईन बँकिंग आणि इंटरनेटवर आधारित मनोरंजन उद्योग यामध्ये वाढ होईल. याचंच उदाहरण द्यायचं झालं तर ऑनलाईन डॉक्टरचा सल्ला देणारी कंपनी प्राक्टोचा व्यवसाय एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान दसपटीने वाढलाय.

येत्या २०२५ पर्यंत कामगारांचे नवीन वर्ग निर्माण होतील, ज्यामध्ये तांत्रिक कौशल्ये आणि यांत्रिकीकरणाचा समावेश मोठ्या प्रमाणात असेल. विश्लेषण, डाटा तज्ज्ञ, कृत्रिम बुद्धीमत्ता, रोबो अभियांत्रिकी या क्षेत्रामध्ये वाढ होत असल्याचे आताच दिसून येत आहे. जागतिक आर्थिक व्यासपीठ 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या मते फ्युचर ऑफ जॉब्ज २०२० अर्थात नोकऱ्यांचे भविष्य २०२० या अहवालानुसार ८५ दशलक्ष नोकऱ्यांचे किंवा नोकरदारांचे विस्थापन कामगार आणि मशिन या दोन प्रकारामध्ये होईल. त्याचवेळी मार्केटिंग, विक्री आणि निर्मिती क्षेत्रामध्ये मानवी सहभागाचे महत्वही वाढत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

नवीन नोकऱ्या आणि व्यवसाय

सीआयओ नियतकालिकानुसार नवीन नोकर्‍या, सुरक्षा व्यावसायिक, क्लाऊड आर्किटेक्ट, डेटाबेस प्रशासक, प्रोग्रामर विश्लेषक, प्रणाली विश्लेषक, मोबाइल अनुप्रयोग विकसक, नेटवर्क प्रशासक, सॉफ्टवेअर विकसक यांची मागणी वेगाने वाढली आहे. 800-अधिक एचआर प्रमुखांच्या, गार्टनरने केलेल्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की 32% संस्था पूर्ण-वेळेच्या कर्मचार्‍यांऐवजी वेळोवेळी काम करणार्‍या कर्मचार्‍यांकडे खर्च-बचत उपाय म्हणून पाहात आहेत. नुकत्याच झालेल्या गार्टनर पोलमध्ये असे दिसून आले आहे की कॉव्हीड -१९ नंतर, महामारीच्या आधी जे दूरूनच काम साधण्याचे प्रमाण ३० टक्के होते, त्यामध्ये वाढ होऊन ते प्रमाण 48% वर जाईल.

“एमआयटी टेक्नॉलॉजी रिव्ह्यू” च्या नवीन पाहणी अहवालात असे दिसून आले आहे की “32 ते 50 दशलक्ष रोजगार” असे आहेत ज्यामध्ये एआय तंत्रज्ञानाद्वारे कमीत कमी मानवी संपर्क ठेवून आरोग्य जोखीम कमी करण्यासाठी जागतिक स्तरावर मदत होऊ शकते. ”. सन २०२० च्या मॅक्किन्सेच्या जागतिक सर्वेक्षणात हे दिसून आले आहे की, महामारीमुळे कंपन्या वेगाने डिजिटल तंत्रज्ञानात गुंतवणूक करीत आहेत, ज्यामुळे ते प्रत्यक्ष संपर्क टाळून अधिकाधिक ग्राहकांना ऑनलाइन भेटू शकतात, त्यातून व्यवसाय वाढविण्यात मदत होते. विशिष्ट प्रशासकीय कार्यांसाठी आणि “विषाणू-अनुकूल” ग्राहक-सेवा सुसंवादांसाठी “डिजिटल कामगार”, (एआय-सक्षम सॉफ्टवेयर प्रोग्राम) मोठ्या प्रमाणात मानवाला मदत करण्यासाठी (आणि कधीकधी त्या बदली) अशी कार्यक्षमता असलेल्या लोकांना कामावर घेतले जाईल. डिजिटल रूपांतरण उपक्रम देखील नवीन भूमिकांची गरज निर्माण करीत आहेत.

फेब्रुवारी 2021मधील बहुतेक लिंक्डइन जॉब पोस्ट्सनुसार, सॉफ्टवेअर अभियंता, नोंदणीकृत नर्स, सेल्सपर्सन, प्रोजेक्ट मॅनेजर, फूड डिलिव्हरी ड्रायव्हर, फुल स्टॅक अभियंता, अ‍ॅनिमल ग्रूमर, जावास्क्रिप्ट डेव्हलपर, डेवॉप्स अभियंता हवे आहेत. आणि लिंक्डइन जॉब पोस्ट्स (जानेवारी 2021 ते फेब्रुवारी 2021) मध्ये वेगाने वाढणारी मागणी असलेल्या नोकर्‍यांमध्ये, अॅनिमल ग्रूमर, फार्मसी तंत्रज्ञ, किरकोळ विक्रेते, वेअरहाऊस सहयोगी, सुरक्षा अभियंता, इंटरफेस डिझाइनर, डेटा आर्किटेक्ट, सॉफ्टवेअर अभियांत्रिकी व्यवस्थापक, सेवा सहकारी यांचा समावेश होतो. सायबर सुरक्षा वाढीसाठीच्या विविध उपाययोजनांची कौशल्ये असणाऱ्या लोकांच्या मागणीतही वाढ झाली आहे.

निष्कर्ष

केवळ कोविडमुळेच नव्हे तर प्रचंड आर्थिक मंदीमुळे पुढील काही वर्षांत कामाचे जग बदलेल. बरेच काही बदल दिसतील, जसे लोक घरून काम करतात आणि ऑफिस संस्कृती जसे की 9 ते संध्याकाळ 5 ही कामाची संकल्पना कमी होत आहे. मालकांना देखील हे हवे आहे, कारण यामुळे त्यांना खर्च कमी करता येईल. व्हर्च्युअल मीटिंग्ज व्यवसायाच्या प्रवासावर परिणाम करतील आणि लोक झूमिंग, स्काईपिंग इत्यादीवर अधिक अवलंबून असतील. “नोकरीचे भविष्य” सर्वेक्षण आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास ५०% कामगारांना नवी कौशल्ये अवगत करण्याची गरज आहे, मागील वर्षाच्य तुलनेत यामध्ये ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मालक त्यांच्या कर्मचार्‍यांच्या कौशल्य विकासात गुंतवणूकीचे मूल्य पाहात आहेत.

रोबोटिक्स, ऑटोमेशन, डिजिटलकरण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारखी उदयोन्मुख तंत्रज्ञानामुळे कामाच्या ठिकाणांच्या गरजा आणि धोरणेच पूर्णपण बदलली आहेत. ही काळाची गरज बनत चालली आहे की २१व्या शतकात नोकऱ्या मिळवण्यासाठी कामगारांनी ही कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालानुसार २०२५ पर्यंत २६ देशातील ८५ दशलक्ष नोकऱ्यात बदल होतील, त्याचवेळी ९७ दशलक्ष नवीन रोजगाराची निर्मिती होईल. लोक बेरोजगार होण्यापासून वाचवायचे असतील तर नवीन कौशल्य विकासावर सरकारांनी लक्ष दिले पाहिजे. गेल्या वर्षातील बहुतांश नवीन पदवीधर अजूनही नोकऱ्या न मिळाल्याने बेरोजगार आहेत, त्यामुळे या वर्षी बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. इटर्नशिपच्या माध्यमातून आता नवीन पदवीधर नवी कौशल्ये आत्मसात करु शकतील ज्यांचा उपयोग भविष्यातील नोकऱ्यांमध्ये होईल.

लिंक्डइनच्या २०२०च्या अहवालानुसार कौशल्यातील तफावत पुढील ३ ते ५ वर्षात भरून निघेल. अन्यथा त्याचा उद्योगांवर परिणाम होईल. अनेक कंपन्या असे होऊ नये यासाठी विविध कौशल्य वाढवण्याच्या कामात सध्या मग्न आहेत. कोरोनामुळे १९५ दशलक्ष नोकऱ्या गमावण्याचा अंदाज आहे. ऑटोमेशनमुळे नोकरी मिळवण्यासाठी नवनवीन कौशल्ये शिकण्याची आज खरी गरज आहे.

कामाच्या ठिकाणी “मशीन्स” चा आणि “नवीन तंत्रज्ञान” चा वापर हा आता जगभरात अनिवार्य होणार आहे. गार्टनरच्या अंदाजानुसार लहान आणि मोठे दोन्ही जगभरातील कामांमध्ये रोबोटची संख्या २०१५ च्या ४.९ दशलक्षवरुन २०२५ पर्यंत ३० अब्जपर्यंत वाढेल. म्हणूनच, सरकार आणि उच्च शिक्षण संस्थांनी नोकरीच्या बाजारपेठेत भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना भविष्यात मशीनसह स्पर्धा करण्यास सक्षम करण्यासाठी विद्यार्थ्यांना आतापासूनच तयार करावे लागेल.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details