महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 26, 2020, 3:07 AM IST

ETV Bharat / opinion

भारताविषयी चीनने दिलेल्या शब्दांचे प्रतिबिंब त्यांच्या कृतीत दिसत नाही: माजी राजदूत

चीनी सरकारचा प्रभाव असलेले महत्त्वाचे इंग्रजी दैनिक ‘द ग्लोबल टाईम्स’ मध्ये “लडाखमध्ये उद्भवलेल्या सीमा वादानंतर चीनच्या हिताविरोधी भूमिका घेत भारताचा व्हिसावर अंकुश ” या शीर्षकाच्या लेखात, चिनी व्यापारी, शिक्षणतज्ज्ञ, उद्योजक आणि वकिलांना व्हिसा देण्यावर भारत बंदी घालणार असल्याच्या ब्लूमबर्गच्या अहवालाचा संदर्भ देत यामध्ये म्हटले आहे की, यात जर तथ्य असेल तर, हे सीमावादाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या भावनेविरोधात उचललेले एक राजकीय पाऊल आहे. “भारत हा चुकीच्या पद्धतीने चीनला शत्रू ठरवत आहे,” असेही या लेखात म्हटले आहे....

China's words don't reflect its actions against India: Ex-envoy
भारताविषयी चीनने दिलेल्या शब्दांचे प्रतिबिंब त्यांच्या कृतीत दिसत नाही: माजी राजदूत

नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये चीनसोबत सुरू असलेल्या सीमा संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने चीनच्या डझनभर वस्तुंवर बंदी घातल्यानंतर, भारत आता चिनी नागरिकांच्या व्हिसावरही अंकुश आणणार असल्याची माहिती विविध प्रसार माध्यमातून समोर येत आहे. तसेच चिनी माध्यमांनी पून्हा एकदा बीजिंग हा नवी दिल्लीचा शत्रू नाही, असा सूर आवळला आहे. परंतु एका माजी भारतीय राजदूतांचे असे म्हणणे आहे की, भारताच्या उत्तरेकडील शेजारचे देश बोलतात एक आणि करतात वेगळं. त्यांच्या बोलण्यात आणि कृतीत नेहमीच विरोधाभास आढळतो.

चीनी सरकारचा प्रभाव असलेले महत्त्वाचे इंग्रजी दैनिक ‘द ग्लोबल टाईम्स’ मध्ये “लडाखमध्ये उद्भवलेल्या सीमा वादानंतर चीनच्या हिताविरोधी भूमिका घेत भारताचा व्हिसावर अंकुश ” या शीर्षकाच्या लेखात, चिनी व्यापारी, शिक्षणतज्ज्ञ, उद्योजक आणि वकिलांना व्हिसा देण्यावर भारत बंदी घालणार असल्याच्या ब्लूमबर्गच्या अहवालाचा संदर्भ देत यामध्ये म्हटले आहे की, यात जर तथ्य असेल तर, हे सीमावादाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या भावनेविरोधात उचललेले एक राजकीय पाऊल आहे. “भारत हा चुकीच्या पद्धतीने चीनला शत्रू ठरवत आहे,” असेही या लेखात म्हटले आहे.

चेंगदू इन्स्टिट्युट ऑफ वर्ल्ड अफेयर्सचे अध्यक्ष लांग झिंगचुन (Long Xingchun) असे म्हणाले की, “चिनी लोकांच्या व्हिसावर निर्बंध आणणे, ही देशातील राष्ट्रवादी लोकांमध्ये चीनविरोधी भावना तयार करण्यासाठी भारतीय अधिकारी आणि राजकारण्यांची ही एक राजकीय युक्ती आहे. यावरुन ते राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नांबाबत किती देशाभिमानी आहेत, ” हे दाखवण्याच्या प्रयत्न ते करत आहेत. जून महिन्यात लडाखमध्ये भारतीय जवानांवर आकस्मित हल्ला करण्यात आला. गेल्या ४५ वर्षात पहिल्यांदाच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अशाप्रकारचा हल्ला करण्यात आला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीने चीनच्या व्हिडीओ- शेअरिंग सोशल नेटवर्किंग सर्व्हिस असणाऱ्या टिकटॉकसह इतर एकूण ५९ अ‍ॅप्सवर बंदी घातली. यानंतर आता चिनी नागरिकांच्या व्हिसावरही निर्बंध लादणार असल्याची माहिती समोर आली आहे.

लडाखच्या पूर्वेकडील पँगोंग त्सो, गलवान खोरे, डेपसंग प्लेन्स आणि गोगरा या प्रदेशांवर चीनने हक्क सांगितल्यानंतर, या महिन्याच्या सुरुवातीपासूनच नवी दिल्ली आणि बीजिंग यांच्यात डिप्लोमॅटीक आणि सैन्य बंदीबाबत बराच गोंधळ उडाला आहे. ग्लोबल टाईम्सच्या लेखामध्ये लांग यांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, “प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा दोन्ही देशांत काहीतरी वाद धुमसतो, तेव्हा तेव्हा चिनी व्हिसावरील निर्बंध आणण्याचा वादही भारताकडून उकरुन काढला जातो. भारताकडून अशाप्रकारची भूमिका नियमितपणे घेतली जाते.” “सध्या भारतातील कोवीड -१९ महामारी आणि चीनविरोधी जनमानस या दोन कारणांमुळे चिनी लोकांना भारतात येण्याला अडथळे निर्माण झाली आहेत. तसेच चीन आणि भारत यांच्यातील देवाण- घेवाण किमान अजून एक वर्ष तरी कोवीडपूर्व स्थितीत येणार नाही,” असे लांग म्हणाले.

या दरम्यान, भारतीय शिक्षण मंत्रालयाने स्थानिक भारतीय शैक्षणिक संस्थांच्या मदतीने चीनच्या कन्फ्यूशियस संस्थेच्या अध्यायांच्या मांडणीचा आढावा घ्यायला सुरु केले आहे. कन्फ्यूशियस संस्था ही चीनमधील महाविद्यालये किंवा विद्यापीठे आणि इतर देशातील महाविद्यालये किंवा विद्यापीठे यांच्यातील सार्वजनिक शैक्षणिक दुवा म्हणुन कार्य करते. याला हॅनबन (अधिकृत चिनी भाषा परिषद आंतरराष्ट्रीय कार्यालय) द्वारे वित्तपुरवठा आणि व्यवस्था केली जाते. हॅनबन ही स्वतः चिनी शिक्षण मंत्रालयाशी संलग्न संस्था आहे. चिनी भाषा आणि संस्कृतीला चालना देणे, आंतरराष्ट्रीय पातळीवर चिनी शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि सांस्कृतिक देवाणघेवाण सुलभ करणे, हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहेत. ही संस्था ज्या देशांमध्ये कार्यरत आहे, त्या देशातील वाढत्या चायनीज प्रभावांमुळे या संघटनेवर मोठ्या प्रमाणात टीका झाली आहे. कन्फ्युशियस इन्स्टिट्यूट प्रोग्रामची सुरुवात २००४ मध्ये झाली. याला हॅनबन संस्थेच्या पाठींबा असून परदेशातील संबंधीत विद्यापीठांच्या देखारेखाली हा अभ्यास शिकवला जातो. ही संस्था सध्या जगभरातील विविध स्थानिक महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या सहकार्याने कार्यरत आहे. याचा आर्थिक भार हॅनबन संस्था आणि यजमान विद्यापीठ यांच्यामध्ये एकत्रितपणे उचलला जातो.

बीजिंग कन्फ्युशियस इन्स्टिट्यूट प्रोग्रामला फ्रान्सच्या अलायन्स फ्रँचायझी आणि जर्मनीच्या गॉथ- इन्स्टिट्यूटप्रमाणे असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. या संस्था संबंधित देशांच्या भाषेला आणि संस्कृतीला इतर देशांत प्रोत्साहन देण्याचे काम करतात. असे असले तरी, अलायन्स फ्रँचायझी आणि गॉथ- इन्स्टिट्यूट इतर देशांमध्ये स्वतंत्रपणे काम करतात. याउलट, कन्फ्युशियस संस्था मात्र इतर देशांतील स्थानिक संस्थांच्या सहकार्याने आणि चिनी सरकारच्या निधीतून चालवली जाते. याबाबत तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, कन्फ्युशियस इन्स्टिट्यूट प्रोग्राम हा बीजिंगच्या “शार्प पॉवर” या विस्तारवादी धोरणाचाच एक भाग आहे. ग्लोबल टाईम्सच्या लेखात असे म्हटले आहे की, एप्रिलमध्ये भारतात गुंतवणूकीचे नवीन नियमन जाहीर केले होते. ज्यामध्ये “चीनी गुंतवणूकदारांविरूद्ध भेदभाव केला असल्याचे समजते.”

गेल्या कित्येक वर्षांपासून, भारताने थेट परकीय गुंतवणूकीशी (एफडीआय) संबंधित नियमनाचे हळूहळू उदारीकरण केले आहे. ज्यामध्ये बहुतेक क्षेत्रांमधील कंपन्या आणि संस्थामध्ये १०० टक्के परकीय मालकी असू शकते. तसेच अनेक क्षेत्रांमध्ये “स्वयंचलित मार्गाने” (automatic route) गुंतवणूक केली जाऊ शकते. असे असले तरी, भारताची सध्याची अर्थव्यवस्था सुस्थितीत नाही. यामुळे भारताच्या सीमेलगतची राष्ट्रे विशेषत: चीन देशातील गुंतवणूकदार कमी किंमतीत भारतीय कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतील. त्यामुळे पुढे जाऊन ते भारताच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वपूर्ण घटक बनू शकतील. अशी एक व्यापक भिती भारताला सतावत आहे.

त्यामुळे अशा ‘संधीसाधू’ गुंतवणूकींना आळा घालण्यासाठी भारताने परकीय चलन व्यवस्थापन (नॉन-डेब्ट इंस्ट्रुमेंट) नियम, २०१९ सुधारित अधिसूचना जारी केली आहे. या सुधारित नियमांनुसार, गुंतवणूक करणाऱ्या कोणत्याही संस्थेचा किंवा व्यक्तीचा किंवा त्याच्या मालकीचा संबंध भारताच्या सीमेवरील देशांच्या एखाद्या नागरिकाला किंवा संस्थेला फायदा मिळवून देण्याबाबत असेल, तर अशा कंपनीला भारतात गुंतवणूक करण्यापूर्वी भारत सरकारची मंजूरी घेणे आवश्यक आहे. हे नियम यावर्षी २२ एप्रिलपासून लागू करण्यात आले आहेत. चीन हा भारताचा शत्रू नाही, असा संदेश देणाऱ्या ग्लोबल टाईम्सच्या लेखाचा संदर्भ देत चीनमधील माजी भारतीय राजदूत गौतम बांबवले म्हणाले की, बीजिंगच्या कृतीचा त्यांच्या शब्दांशी मेळ बसत नाही. “जर तुम्ही (चीन) भारताला शत्रू मानत नसाल, तर लडाखमध्ये तुम्ही तुमच्या ठिकाणी परत का जात नाही?” असे बांबवले यांनी ईटीव्ही भारतच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले.

चिनी अ‌ॅप्सवरील बंदीचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार नाही का? असा प्रश्न विचारला असता, या माजी राजदूतांनी सांगितले की, याचा फटका चीनच्या अर्थव्यवस्थेला जास्त बसेल. बांबवले यांनी विशेषतः टिकटॉकवरील बंदीचा उल्लेख केला. यामुळे त्यांना खरोखरच खुप जास्त फटका बसत असल्याचे त्यांनी सांगितले. “भारताने टिकटॉकवर बंदी घालून पहिले पाऊल उचलले आहे. आणि आता अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियाही टिकटॉकवर बंदी घालण्याचा विचार करीत आहेत,” असेही ते पुढे म्हणाले.

चीन आणि अमेरिका यांच्यात तर व्यापार युद्ध धुमसत आहेच. त्याचबरोबर भारतासोबत असलेल्या सीमावादा व्यतिरिक्त बीजिंगचे इंडो- पॅसिफिक प्रदेशातील आपले विस्तारवादी धोरण, दक्षिण चीन सागरी प्रदेशातील देशांसोबतचा वाद आणि जपानसोबतचा पूर्व चीन समुद्रातील संघर्ष असे अनेक देशांशी सध्या वाद सुरु आहेत. यामुळे जपानच्या पूर्व किनारपट्टीपासून ते आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीपर्यंत पसरलेल्या इंडो- पॅसिफिकमध्ये शांतता व समृद्धीसाठी काम करण्याच्या प्रयत्न अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाकडून केला जात आहे. या देशांच्या कार्यात आता भारतही सामील झाला असून भारत हा या चौकडीचा एक भाग बनला आहे.

- अरुणिम भुयान

ABOUT THE AUTHOR

...view details