महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / lifestyle

यंग युझर्ससाठी रियलमीने मिळविले हाय क्वालिटीचे नवे मानांकन

रियलमी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपाध्यक्ष माधव शेठ यांनी एक ट्विट करून याची माहिती दिली आहे.

यंग युझर्ससाठी रियलमीने मिळविले हाय क्वालिटीचे नवे मानांकन
यंग युझर्ससाठी रियलमीने मिळविले हाय क्वालिटीचे नवे मानांकन

By

Published : Apr 9, 2021, 6:55 AM IST

नवी दिल्ली : टीयुव्ही ऱ्हेनलँड हाय-रिलायबिलिटी प्रमाणपत्र मिळणारा रियलमी हा जगातील पहिला ब्रँड ठरला आहे. रियलमीच्या सी21 आणि सी25 हे स्मार्टफोन हे प्रमाणपत्र मिळणारे पहिले स्मार्टफोन ठरले आहेत.

माधव शेठ यांनी दिली माहिती

रियलमी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपाध्यक्ष माधव शेठ यांनी एक ट्विट करून याची माहिती दिली आहे. 'दर्जासाठी जगविख्यात असलेल्या टीयुव्ही ऱ्हेनलँडसोबतच्या भागीदारीची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. उच्च दर्जा आणि मानके असलेल्या स्मार्टफोनसाठी आम्ही त्यांच्यासोबत काम केले आहे.' असे ट्विट त्यांनी केले आहे. रियलमीच्या सर्व स्मार्टफोनच्या दर्जा नियंत्रण आणि चाचण्यांसाठी सर्टिफिकेशनचा वापर केला जाईल असेही रियलमीने म्हटले आहे.

23 महत्वाच्या चाचण्या

टीयुव्ही ऱ्हेनलँड स्मार्टफोन हाय-रिलायबिलिटी सर्टिफिकेशनच्या प्रक्रियेत 23 महत्वाच्या चाचण्या केल्या जातात. यात 10 नियमित वापरासंबंधीच्या चाचण्यांचा समावेश असतो. यात ड्रॉप टेस्ट, विअर अँड टिअर अशा चाचण्यांचा समावेश असतो. तर सात टोकाच्या वातावरणातील चाचण्यांचा समावेश असतो. अतितप्त, अतिआर्द्र, व्होल्टेज फ्लक्चुएशन, बटन लाईफ, स्टॅटीक इलेक्ट्रिसिटी, एअर प्रेशर अशा चाचण्या यात असतात. तर सहा कम्पोनन्ट रिलायबिलिटी टेस्टचा समावेश यात असतो.

ABOUT THE AUTHOR

...view details