महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / lifestyle

सॅमसंग गॅलक्सी एम १२ भारतात लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये

सॅमसंग गॅलक्सी एम १२ हा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये ४जीबी रॅम +६४ जीबी स्टोअरेजचा स्मार्टफोन हा १०,९९९ रुपयांना आहे. तर ६ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरजेचा स्मार्टफोन हा १३,४९९ रुपयांना आहे.

Samsung Galaxy M12
सॅमसंग गॅलक्सी एम १२

By

Published : Mar 12, 2021, 3:01 PM IST

नवी दिल्ली- सॅमसंगने नवीन एम-श्रेणीमधील गॅलक्सी एम १२ हा स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये ४८ मेगापिक्सेलचा क्वाड कॅमेरा सेटअप आणि ९० हर्टझ रिफ्रेश रेट डिसप्ले आहे.

सॅमसंग गॅलक्सी एम १२ हा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये ४जीबी रॅम +६४ जीबी स्टोअरेजचा स्मार्टफोन हा १०,९९९ रुपयांना आहे. तर ६ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरजेचा स्मार्टफोन हा १३,४९९ रुपयांना आहे. गॅलक्सी एम श्रेणी लाँच होऊन दोन वर्ष पूर्ण झाल्याचे सॅमसंग इंडियाचे मोबाईल मार्केटिंग प्रमुख आणि वरिष्ठ संचालक आदित्य बाबर यांनी सांगितले. ग्राहकांच्या मुलभूत गरजा लक्षात घेऊन हे मॉडेल लाँच करण्यात आले आहे. नवीन गॅलक्सी एम१२ मध्ये नवीन वैशिष्ट्ये समाविष्ट केल्याचही बाबर यांनी माहिती दिली.

सॅमसंग गॅलक्सी एम १२

हेही वाचा-मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण : सचिन वझेंची नियंत्रण कक्षात बदली

ही आहेत सॅमसंग गॅलक्सी एम १२ ची वैशिष्ट्ये-

  • ६.५ इंच एचडी + (७२०x १,६०० पिक्सेल्स) टीएफटी इनफिनिटी व्ही डिसप्ले हा २०:९आहे.
  • स्मार्टफोनला एक्सिनोस ८५० एसओसी आणि ६ जीबी रॅम आहे. तर इंटरर्नल स्टोअरेजची क्षमता ही १२८ जीबीपर्यंत आहे.
    सॅमसंग गॅलक्सी एम १२
  • हे डिव्हाईस अँड्राईडवर आधारित यूआ कोअर ओएस आणि नॅनो ड्यूल सीमवर चालते.
  • क्वाड कॅमेरा सेटअप आहे. त्यामध्ये ४८ मेगापिक्सेलचे प्रायमरी सेन्सर आणि एफ/२.० अपेर्ट्यूर, ५ मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड सेन्सर, २ मेगापिक्सेलचे मॅक्रो सेटअप आणि २ मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे.
  • स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे.
  • स्मार्टफोनमध्ये ६,००० एमएएच बॅटरी आहे.
  • गॅलक्सी एम १२ मध्ये ४जी एलटीई, वाय-फाय ८०२.११ बी/जी/एन, ब्ल्यूटूथ ५.०, जीपीएस, ए-जीपीएस, यूएसबी टाईप-सी आणि ३.५ एमएम हेडफोन जॅक आहे.

हेही वाचा-लबाड सरकारची बेबंदशाही; एमपीएससी प्रकरणावरून चंद्रकांत पाटलांचा निशाणा

ABOUT THE AUTHOR

...view details