महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / lifestyle

WhatsApp च्या सर्च फिचरमध्ये होणार मोठा बदल, जाणून घ्या...

इन्स्टंट मॅसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप वर जर तुम्हाला फोटो, लिंक, व्हिडिओ किंवा फाईल शोधण्यात अडचण येत आहे तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. व्हॉट्सअॅप आपल्या सर्च फिचरला आणखी अपग्रेड करत आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या फिचरचे सध्या बीटा टेस्टिंग सुरू आहे.

व्हॉट्सअॅप

By

Published : Mar 1, 2019, 5:37 PM IST

टेक डेस्क - इन्स्टंट मॅसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप वर जर तुम्हाला फोटो, लिंक, व्हिडिओ किंवा फाईल शोधण्यात अडचण येत आहे तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. व्हॉट्सअॅप आपल्या सर्च फिचरला आणखी अपग्रेड करत आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या फिचरचे सध्या बीटा टेस्टिंग सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार व्हॉट्सअॅपचा हा फिचर चॅट टॅबमध्ये दिसणार आहे. तुम्ही सर्च बारवर टॅप केले तर तुम्हाला अनेक विकल्प दिसणार. यामध्ये व्हिडिओज, लिंक्स आणि डॉक्यूमेंट्सचाही समावेश आहे. तुम्ही या विकल्पामधून कोणताही एक विकल्प निवडून सर्च करू शकता. तुम्ही ग्रुप चॅट मधून कोणताही फोटो किंवा फाईल सर्च करू शकता. या शिवाय तुम्ही ऑडिओही सर्च करू शकता. तुम्हाला सर्व चॅट्सचे ऑडिओ दिसणार मात्र ऑडिओ फाईलचा प्रिव्यू दिसणार नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार या फिचरला सध्या आयओएस प्लॅटफॉर्मसाठी टेस्ट करण्यात येत आहे. लवकरच या फिचरचा आयओएस डिव्हाईस रोल आउट करण्यात येणार. येत्या काळात हे फिचर अँड्रॉईड डिव्हाईसमध्येही उपलब्ध होणार. सध्या व्हॉट्सअॅपने पहिल्या बायोमॅट्रिक फिचरला आयओएस युजर्ससाठी रोलआउट केले होते. या फिचरला व्हॉट्सअॅपच्या लेटेस्ट व्हर्जनसोबत वापरता येते. सध्या हा फिचर अँड्रॉईड युजर्ससाठी रोलआउट करण्यात आलेला नाही.

यावर्षी व्हॉट्सअॅपमध्ये अनेक नवे फिचर्स जुडणार आहेत. यामध्ये डार्क मोड, ग्रुप चॅट फिचर्स अन्य सामिल आहेत. ग्रुप चॅट फिचर्समध्ये मोठे बदल करण्यात येणार आहे, असे समजते. या शिवाय डार्क मोड फिचर्सची युजर्स खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. या फिचरच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप रात्री वापरताना त्रास होणार नाही. तुम्ही डार्क मोड ऑन करुन याचा वापर करू शकता.

ABOUT THE AUTHOR

...view details