ठाणे - लाचेच्या स्वरूपात महिलेकडे शारीरिक सुखाची मागणी एका लिपिकाने केली होती. या विकृत लिपिकाला पकडण्यासाठी उद्यानात सापळा लावण्यात आला. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी लिपिकाला ताब्यात घेवून गजाआड केले आहे. रमेशचंद्र लक्ष्मण राजपूत (वय ४८ वर्षे,) असे या विकृताचे नाव आहे.
धक्कादायक ! लाचेच्या स्वरूपात महिलेकडे शारीरिक सुखाची मागणी, लिपिक गजाआड
लाचेच्या स्वरूपात महिलेकडे शारीरिक सुखाची मागणी एका लिपिकाने केली होती. या विकृत लिपिकाला पकडण्यासाठी उद्यानात सापळा लावण्यात आला. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱयांनी लिपिकाला ताब्यात घेवून गजाआड केले आहे. रमेशचंद्र लक्ष्मण राजपूत (वय ४८ वर्षे,) असे या विकृताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील 'क' प्रभागातील कर विभागात विकृत राजपूत हा लिपिक म्हणून म्हणून कार्यरत होता. याच प्रभागातील ३० वर्षीय तक्रारदार महिलेच्या राहत्या घराचे प्रलंबित मालमत्ता कर भरण्यास विकृत लिपिकाने जप्ती वॉरंट बजावणी पूर्व अखेरची सुचना काढली होती. सदरच्या नोटीस अनुषंगाने मालमत्ता कर भरण्यास मुदत वाढवून देण्यासाठी व मालमत्ता कराची रक्कम कमी करून देण्यासाठी लाचेच्या स्वरुपात या विकृत लिपिकाने पीडित महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली होती. यामुळे तक्रारदार महिला यांनी ठाणे लाचलुचपत विभागाकडे धाव घेवून लेखी तक्रार पुराव्यासह दाखल केली होती.
दरम्यान या तक्रारीवरून आज कल्याण पश्चिमेला असलेल्या सुभाष मैदान येथील गार्डनमध्ये तक्रारदार यांना भेटण्यासाठी विकृत लिपिकाने बोलावले होते. त्यादरम्यान आधीच सापळा लावून बसलेल्या लाचलुचपत अधिकाऱ्यांच्या जाळ्यात हा वासनांध अडकला. त्याच्यावर बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरूआहे.