चंद्रपूर- उपविभाग गडचांदूर अंतर्गत कोरपना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारंडा फाटा रोडवर अवैध दारूसाठ घेऊन जाणाऱ्या ट्रकला पकडण्यात कोरपना पोलिसांना यश आले आहे. आरोपीला ताब्यात घेऊन कोरपना पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरपना तालुक्यात मोठ्या प्रमाणात दारूसाठा जप्त; एकास अटक
ट्रकमध्ये दारूच्या 100 पेट्या होत्या. पोलिसांनी एकूण 35 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी प्रकाश उईके उर्फ लोखडे याला ताब्यात घेतले आहे. ही कार्यवाही उपविभागीय अधिकारी विलास यामावार यांच्यासह ठाणेदार अरुण गुरनुले, वसंत रायसिडाम, प्रकाश निमकर, राम हाके, स्वप्नील बोंडे यांनी केली.
दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध दारूविक्रीचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. अशात पोलीस विभागाकडून कार्यवाहीलाही वेग आला आहे. कोरपना तालुक्यातील नारंडा फाटा मार्गावर एका ट्रकमधून दारूची वाहतूक होत होती. या ट्रकला कोरपना पोलिसांनी सापळा रचून पकडले.