वॉशिंग्टन- अमेरिकेत बंदूक परवान्यांवर कडक निर्बंध नसल्याने सार्वजनिक ठिकाणी गोळीबाराच्या घटना नेहमीच घडतात. अशीच घटना पुन्हा एकदा घडली आहे. अॅलन शहरात शनिवारी नेहमीप्रमाणे नागरिक मॉलबाहेर खरेदीसाठी उभे होते. तेव्हा अचानक गोळीबार सुरू झाल्यानंतर एकच धांदल उडाली. मात्र, हा माथेफिरून गोळीबार केल्याचे समोर येत आहे.
काही वेळातच तुटलेल्या खिडक्या आणि दारापर्यंत रक्ताचे लोट पडलेले दिसून आले. बाजूला फेकलेल्या चपला आणि रक्ताने माखलेले कपडे पडले होते. कर्मचार्यांनी ताबडतोब सुरक्षा गेट खाली आणले. पोलीस येईपर्यंत सर्वांना स्टोअरच्या मागील बाजूला आणत बाहेर काढले. गोळीबाराच्या घटनेचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या पेटनने यांनी सांगितले, की, काय घडले आहे, हे पाहण्यासाठी बाहेर पडलो. तेव्हा मला धक्का बसला. काळे कपडे घातलेला एका लठ्ठ माणसाचे शरीर दिसले. तो मारेकरी होता. इतर मृतदेहांप्रमाणे त्याचा मृतदेह झाकला नव्हता.
पोलिसांचा तपास सुरू-स्टोअरमधून बाहेर पडताच रोमेरो म्हणाला, की मॉल रिकामा दिसत होता आणि सर्व दुकानांचे सुरक्षा दरवाजे खाली होते. तेव्हाच त्याला तुटलेली काच आणि जमिनीवर गोळ्या झाडलेले लोक दिसायला लागले. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये लोक पार्किंगमधून पळत असताना गोळीबाराचा आवाज ऐकू येतो. अमेरिकेचे संसद प्रतिनिथी कीथ सेल्फ यांनी सांगितले की अॅलन पोलिस विभागाचे या जागेवर पूर्ण नियंत्रण आहे. गोळीबार करणाऱ्या मारेकऱ्याचा मृत्यू झाला आहे. पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आमच्या प्रार्थना आहेत. घटनास्थळावरील सर्व कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांसोबत आहेत. ऍलन पोलिस विभागाकडून तपास सुरू आहे. घटनास्थळापासून काही काळ दूर राहण्याचाही पोलिसांनी सल्ला दिला आहे. अॅलन, डाउनटाउन डॅलसच्या उत्तरेस सुमारे 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या उपनगरात अंदाजे १ लाख रहिवासी राहतात.