कोलंबो - रानिल विक्रमसिंघे ( Sri Lankan Prime Minister Ranil Wickremesinghe ) यांनी शनिवारी श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी त्यांनी राजीनामा देण्याचे बोलले होते. देशात सर्वपक्षीय सरकार स्थापनेसाठी मार्ग काढता यावा म्हणून आपण राजीनामा देण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले होते. सर्वपक्षीय सरकार स्थापन झाल्यानंतर आणि संसदेत बहुमत मिळाल्यानंतर ते पंतप्रधानपदाचा राजीनामा देतील, असे पंतप्रधानांच्या माध्यम विभागाने म्हटले आहे. तोपर्यंत विक्रमसिंघे पंतप्रधानपदी कायम राहतील, असे त्यांच्या कार्यालयाने म्हटले आहे.
रानिल विक्रमसिंघे यांनी पक्षाच्या नेत्यांना सांगितले की या आठवड्यापासून देशव्यापी इंधन वितरण पुन्हा सुरू होणार आहे हे लक्षात घेऊन आपण पद सोडण्याचा निर्णय घेत आहोत. जागतिक अन्न कार्यक्रमाचे ( WFP ) संचालक या आठवड्यात देशाच्या दौऱ्यावर येणार ( World Food Programme Director visit Sri Lanka ) आहेत. IMF साठी कर्ज सातत्य अहवाल लवकरच अंतिम केला जाईल.