वॉशिंग्टन :अमेरिकेत सलग दुसऱ्या दिवशी गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंगळवारी पहाटे इंडियाना प्रांतातील गॅरी येथे एका ब्लॉक पार्टीदरम्यान झालेल्या गोळीबारात ( Shooting during party in Indiana region ) तीन जण ठार झाले आणि सात जण जखमी झाले. गॅरी पोलिसांनी सांगितले की त्यांना मिसुरी स्ट्रीटच्या 1900 ब्लॉकमध्ये रात्री 12:45 च्या सुमारास झालेल्या गोळीबारात अनेक लोक जखमी झाल्याची माहिती मिळाली.
घटनेनंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. अधिका-यांनी सांगितले की, तपासकर्ते गोळीबाराच्या परिस्थितीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्यात एकापेक्षा जास्त आरोपी सामील होते का?