महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

Sudan Plane Crash: सुदानमध्ये प्रवाशी विमानाचा अपघात, 4 लष्करी जवानांसह 9 जणांचा मृत्यू

पोर्ट सुदान विमानतळावर प्रवाशी विमानाचा अपघात झाला. सुदानच्या लष्करानुसार टेक ऑफ करताना विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने विमान कोसळले

सुदानमध्ये प्रवाशी विमानाचा अपघात
सुदानमध्ये प्रवाशी विमानाचा अपघात

By

Published : Jul 24, 2023, 1:42 PM IST

खार्तूम: सुदानचे लष्कर आणि निमलष्करी दल यांच्यात सुरू झालेल्या युद्ध 100 दिवस झाले आहेत. याचदरम्यान रविवारी पोर्ट सुदान विमानतळावर एक प्रवाशी विमान कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 4 लष्कर जवानांसह एकून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. यात एका लहान मुलीचा समावेश असल्याची माहिती सुदानच्या लष्कराने दिली आहे.

तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळले: सुदानच्या लष्कराने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, पोर्ट सुदान विमानतळावर तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशी अँटोनोव्ह विमान कोसळले आहे. यात 4 लष्करी कर्मचाऱ्यांसह 9 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान सुदान लष्कर आणि निम्मलष्कर रॅपिड सपोर्ट दल (आरएसएफ) यांच्यादरम्यान 15 एप्रिलला युद्ध सुरू झाले आहे. या गृहयुद्धाला रविवारी 100 दिवस पूर्ण झाले आहेत. दरम्यान गया आणि दारफुर क्षेत्रात झालेल्या रॉकेट हल्ल्यात 16 जणांचा मृत्यू झाला आहे.

स्नाइपर्सचा रहिवशांवर हल्ला : स्थानिक वकील संघटनेच्या म्हणण्यानुसार, दक्षिण दारफुर राज्याची राजधानी न्याला येथे हा प्रकार घडला. स्नाइपर्सने चाडमध्ये राजधानी एल-जेनिनासह पश्चिम दारफुरमधील लोकांना लक्ष्य केले होते. तसेच हजारो रहिवाशांना सीमेपलीकडे पळवून लावले. स्नाइपरने एका व्यक्तीला ठार केले असल्याचा दावा दारफूर बार एसोसिएशनने म्हटले आहे. हजारो लोक पश्चिम दारफुर प्रदेशातून पळून जात आहेत. हे नागरिक शेजारी असलेल्या चाडच्या सीमेवर पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान चाडमध्ये गेलेल्या निर्वासितांसोबतही हिंसाचार झाला आहे. नागरिकांच्या मते, त्यांना त्यांच्या जातीच्या आधारावर आरएसएफ-संलग्न मिलिशियांनी लक्ष्य केले. दरम्यान सुदान गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर जाणार असल्याचा, असा इशारा संयुक्त राष्ट्राने एका आठवड्यापूर्वी दिला होता. सुदानच्या ओमदुरमन शहरातील रहिवाशी भागांवर झालेल्या हल्ल्यात डझनभर लोक मारले गेले होते. देशाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, 8 जुलै रोजी झालेल्या गोळीबाराच्या हल्ल्यात किमान 22 लोक ठार झाले होते. सुदानमधील गृहयुद्धाला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. सुदानच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, हिंसाचारात आतापर्यंत 1 हजार 136 लोकांचा मृत्यू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details