महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

Nancy Pelosi lands in Taipei Taiwan: यूएस तैवान आर्थिक सहकार्य वाढविण्यावर आमचा भर - नॅन्सी पेलोसी

अमेरिकेच्या संसदीय प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी (डी-कॅलिफ) यांनी बुधवारी तैवानचे अध्यक्ष त्साई इंग-वेन आणि इतर नेत्यांची भेट घेतली (Nancy Pelosi in Taiwan ). या बैठकीपूर्वी अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी बुधवारी तैवानच्या संसदेला संबोधित केले.

By

Published : Aug 3, 2022, 10:00 AM IST

नॅन्सी पेलोसी
नॅन्सी पेलोसी

तैपेई: अमेरिकेच्या संसदीय प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी (डी-कॅलिफ) यांनी बुधवारी तैवानच्या अध्यक्ष त्साई इंग-वेन आणि इतर नेत्यांची भेट घेतली (Nancy Pelosi in Taiwan ). या बैठकीपूर्वी अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी बुधवारी तैवान संसदेला संबोधित केले. पेलोसी यांनी बुधवारी अध्यक्ष त्साई इंग-वेन यांच्या नेतृत्वाबद्दल आभार मानले. आंतर-संसदीय सहकार्य वाढवण्याचे त्यांनी आवाहन केले. पेलोसीने तैवानच्या संसदेत सांगितले की, आम्ही जगातील सर्वात स्वतंत्र समाजांपैकी एक म्हणून तैवानचे कौतुक करतो. चीनशी स्पर्धा करण्यासाठी यूएस चिप उद्योगाला चालना देण्याच्या उद्देशाने नवीन यूएस कायदा "यूएस-तैवान आर्थिक सहकार्यासाठी अधिक संधी प्रदान करतो."

यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी मंगळवारी रात्री तैवानमध्ये पोहोचल्या. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, पेलोसींचे विमान रात्री उशिरा तैपेईमध्ये उतरले. विशेष म्हणजे 25 वर्षांहून अधिक काळ तैवानला भेट देणाऱ्या त्या सर्वोच्च अमेरिकन नेत्या आहेत. एकप्रकारे त्यांनी यादृष्टीने इतिहास रचला आहे. पेलोसी यांच्या भेटीमुळे चीन आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला आहे. चीन तैवानचा भाग असल्याचा दावा करत आहे. परदेशी नेते तसेच अधिकार्‍यांनी तैवानला दिलेल्या भेटींना चीन नेहमीच विरोध करतो. कारण चीनला असे असे वाटते की यामुळे या बेटाचा प्रदेश सार्वभौम म्हणून ओळखला जाण्यास खतपाणी मिळते.

हेही वाचा - पुतीन यांच्या कथित गर्लफ्रेंडवर अमेरिकेने लादले नवीन निर्बंध

ABOUT THE AUTHOR

...view details