महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

Nobel Prize In Literature : नॉर्वेजियन लेखक जॉन फॉस यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार

नॉर्वेजियन लेखक जॉन फॉसे यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. फॉसे यांच्या नाविन्यपूर्ण नाटकांसाठी आणि गद्यासाठी हा पुरस्कार त्यांना जाहिर करण्यात आला आहे.

Nobel Prize In Literature
Nobel Prize In Literature

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 5, 2023, 8:36 PM IST

होम : 2023 सालचा साहित्याचा नोबेल पुरस्कार नॉर्वेजियन लेखक जॉन फॉसे यांना देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यांना हा पुरस्कार त्यांच्या नाविन्यपूर्ण नाटक, गद्यासाठी दिला जात आहे. जॉन फॉसे यांनी त्यांच्या नाटकांमध्ये नेहमीच नवनवीन प्रयोग केले आहेत. त्यांनी लिहिलेल्या नाटकांपैकी, समवन इज गोइंग टू कम होम, द नेम, द चाइल्ड, मदर अँड चाइल्ड या नाटकांचा समावेश आहे.

पहिली कादंबरी 1983 मध्ये प्रकाशित :जॉन फॉसे यांचा जन्म नॉर्वेच्या हॉजेसुंड येथे झालाय. त्यांनी बर्गन विद्यापीठात तुलनात्मक साहित्याचा अभ्यास केलाय. त्यानंतर त्यांची साहित्यिक कारकीर्द सुरू झाली. त्यांची पहिली कादंबरी, राउड्ट, स्वार्ट (लाल, काळा) 1983 मध्ये प्रकाशित झाली होती. जॉन फॉसे यांनी फक्त नॉर्वेजियन भाषेत लेखन केलंय.

'फॉसे मिनिमलिझम' : जॉन फॉस यांनी 'फॉस मिनिमलिझम' म्हणून ओळखल्या जाणार्‍या शैलीत कादंबऱ्या लिहिल्या आहेत. हे त्याच्या दुसर्‍या कादंबरी 'स्टेन्ज्ड गिटार' (1985) मध्ये पाहिलं जाऊ शकतं. यात फॉसे यांनी स्त्रीची कोंडी, तिच्या दुःखाबद्दल लिहलं आहे. त्याच्या एका कांदबरीत, एक स्त्री कचरा टाकण्यासाठी बाहेर पडते, तेव्हा तिच्या घराचं दार बंद होतं. तिचं मूल आतमध्ये अससं. तिला लोकांकडं मदत मागायची आहे, पण तिला तिच्या मुलाला एकटे सोडून मदत मागायला जायचंसुद्धा नाहीय अशी कथा फासे यांनी लिहली आहे.

जॉन फॉसेंच्या लेखनात आधुनिक संबंध : जॉन फॉसेंच्या लेखनात आधुनिक कलात्मक तंत्रांसह भाषिक आणि भौगोलिक दोन्ही मजबूत संबंध दिसून येतात. त्यांनी आपल्या लेखनात सॅम्युअल बेकेट, थॉमस बर्नहार्ड आणि जॉर्ज ट्रॅकल यांसारख्या नावांचा समावेश केला आहे.

'यांना' मिळालाय साहित्याचा नोबेल : सन 2022 मध्ये हा पुरस्कार फ्रेंच लेखिका अ‍ॅन एरनॉक्स यांना देण्यात आला. अ‍ॅन एरनॉक्स यांनी क्लिनिकल एक्युटीवर अनेक लेख लिहिले आहेत. अ‍ॅन एरनॉक्स यांनी फ्रेंच आणि इंग्रजी भाषेत अनेक कादंबऱ्या, लेख, नाटकं आणि चित्रपटही लिहिले आहेत. त्याच वेळी, 2021 मध्ये, कादंबरीकार अब्दुलराजक गुरनाह यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या लेखनातून वसाहतवाद आणि संस्कृतीचे दुष्परिणाम मांडल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. 2019 मध्ये, ऑस्ट्रियामध्ये जन्मलेले लेखक पीटर हँडका यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. नाविन्यपूर्ण लेखन आणि भाषेतील नवीनतम प्रयोगांसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

हेही वाचा -

  1. Nobel Prize In Physics 2023 : पियरे अगोस्टिनी, फेरेंक क्रॉझ, ॲन एल हुलियर ठरले नोबेलचे मानकरी
  2. Nobel Prize For Medicine : कॅरिको आणि वेसमन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर; 'हे' आहे योगदान
  3. Nobel Prize in Economic Sciences : बेन एस बर्नांक, डग्लस डब्ल्यू डायमंड आणि फिलिप एच डायबवी यांना नोबेल पारितोषिक जाहीर

ABOUT THE AUTHOR

...view details